12:04am | Jan 08, 2020 |
कराड : मठाधिपती होण्याच्या वादातून कराडकर मठाचे मठाधिपती हभप जयवंतबुवा पिसाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच मठाचे माजी मठाधिपती हभप बाजीराव कराडकर यांनी ही हत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली असून पोलिसांनी कराडकरला अटक केली आहे. अध्यात्मिक क्षेत्रात गुन्हेगारी प्रवेश करते की काय ? अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मारुतीबुवा कराडकर यांच्या निधनानंतर मठाधिपती कोण ? यावरून गेले अनेक वर्षे वाद सुरू आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अनिलनगर परिसरातील कराडकर महाराजांच्या मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंत बुवा पिसाळ आणि बाजीराव बुवा कराडकर यांच्यामध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद होता. हे दोघे काल एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आले होते. आज दुपारी पुन्हा "मठाधिपती तू का मी" यावरून वाद सुरु झाला. त्यातून बाजीराव महाराजांनी जयवंत महाराजांच्या अंगावर चाकूने हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केली.
मारुतीबुवा कराडकर मठामध्ये गेल्या काही वर्षापासून मठाधिपतीवरून वाद सुरू आहे. त्याच वादातून माजी मठाधिपती बाजीराव बुवा गुरू मारुतीबुवा कराडकर (वय ३४,कोडोली, ता. कराड ) यांनी विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ (वय ३३, लवंगमाची,ता.वाळवा, जि.सांगली) यांची चाकूने वार करून हत्या केली.मठामध्येच दोन्ही महाराजांमध्ये वाद झाला आणि त्या दरम्यान बाजीराव बुवांनी चाकूने हल्ला करून जयवंतबुवा यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस मठामध्ये दाखल झाले आणि आरोपी बाजीराव बुवास घटनास्थळी अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.
मठाचा मठाधिपती कोण ? यातून असलेला वाद इतका विकोपाला गेला की, वारकरी संप्रदायाची शिकवण हे दोघे विसरुन गेले.पोलिसांनी बाजीराव कराडकरला अटक केली आहे.या घटनेमुळे वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |