11:07pm | Apr 01, 2020 |
सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेकडून शहरात धूर व औषध फवारणीची कामे गतीने सुरू आहेत. या कामांची बुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी शहराच्या पूर्व भागाची पाहणी केली. सदर बझार सह, लक्ष्मी टेकडी व कामाटीपुरा या भागात काही ठिकाणी फवारणी झालेली नाही, त्याची माहिती बुधवारी नगराध्यक्षांनी घेतली.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेकडून शहरात घर टू घर सर्व्हे केला जात आहे. शिवाय आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून शहरातील मुख्य ठिकाणांसह गल्लीबोळातही धूर व जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे देखील शहरात सोडियम हायपो क्लोराईड या औषधाची फवारणी दिवस-रात्र सुरू आहे. ही कामे कशा पद्धतीने सुरू आहेत महत्वाच्या ठिकाणी औषध फवारणी केली जातेय की नाही अशा अनेक बाबींचा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बुधवारी आढावा घेतला.
लक्ष्मी टेकडी, सदर बझार, मल्हारपेठ, गोडोली, कुपर कॉलनी, भिमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी, कामाठीपुरा, या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आरोग्य कर्मचारी स्वच्छतेबरोबरच इतर कामे जबाबदारीने पार पाडत आहेत. यासाठी सर्वांचे कौतुक करायला हवे. असे सांगून ज्या ठिकाणी अद्याप धूर व औषध फवारणी झालेली नाही अशा ठिकाणी ही मोहीम तातडीने राबविण्यात यावी अशा सूचनाही नगराध्यक्षांनी केल्या. गुरुवारपासून नगरसेवकांसह प्रभाग निहाय आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |