03:53pm | Sep 24, 2018 |
सातारा (संग्राम निकाळजे ) : यावर्षीचा गणेशोत्सव सातारा जिल्ह्यासह राज्यभरात चर्चिला गेला. माध्यमांनीही या प्रकरणात हवा भरल्यामुळे सातारा गणेशोत्सव हाय व्होल्टेज झाला होता. सातार्यात डॉल्बी वाजणारच! या खा. उदयनराजेंच्या भूमिकेमुळे आयजी नांगरे पाटलांसह सातारा पोलीस पुरते गांगरुन गेले होते. त्यातच मंगळवार तळे गणेश विसर्जनाचा तिढा निर्माण झाला. मात्र, नांगरे पाटलांनी परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा सातारा जिल्हा केंद्रबिंदू मानून कामास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या तगड्या नियोजनामुळे काल गणेश विसर्जनादिवशी सातार्यात डॉल्बीच काय, साधा स्पिकरही वाजला नाही. मात्र डॉल्बी वाजवणारे खा. उदयनराजे काल गणेशोत्सवात पूर्ण दिवसभर न दिसल्यामुळे ‘आरं बच्चन कुठंय?’ या कुजबुजीमुळे खासदार गटाचे कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभरात डॉल्बी वाजविण्यावर बंदी आलेली आहे. डेसिबलची मर्यादा ठेवून डॉल्बी वाजविण्यास हरकत नाही, असाही निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र मिरवणूक ऐन रंगात येताच डॉल्बी सिस्टमची बटणे फिरु लागतात व आपोआप 80 डेसिबलच्या पुढे डॉल्बी सिस्टमचा आवाज वाढवला जातो. पर्यायाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जातो. ही झंझटच नको म्हणून जिल्हा प्रशासनाने भादंवि 144 नुसार कारवाई करीत जिल्हाभरात डॉल्बी सिस्टम जागेवरच सील केल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शेकडोजणांना हद्दपारीच्या नोटीसी बजावल्यामुळे जिल्ह्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत झाली. नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे या मोडस ओपरेंडीमुळे पोलीस दलाची डोकेदुखी वाढत असे. मात्र पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या तगड्या नियोजनामुळे वरातीपुढूनच घोडे नाचायला लागले.
सातार्याचे खासदार उदयनराजे कधी काय बोलतील आणि करतील, याचा नेम नाही. खा. उदयनराजेंनी लोकभावनेच्या आग्रहास्तव सातार्यात डीजे वाजणार, असा शब्द सातारकरांना दिला होता. मात्र कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी उदयनराजेंचे हे वक्तव्य फारच मनाला लावून घेतले. त्यामुळे सातार्यातील गणेशोत्सवाच्या बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या डॉल्बी बंदीची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे निक्षून सांगितले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांना नांगरे पाटलांनी मास्टर प्लॅन तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी डॉल्बी सिस्टमवर कारवाईचा धडाका सुरु केला. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजविण्यास डॉल्बीच सातारा जिल्ह्यात शिल्लक राहिली नाही, असे चित्र दिसून आले. सातारा शहर सोडल्यास जिल्ह्यात फलटण, कराड, वाई याठिकाणी डॉल्बी सिस्टम मर्यादित आवाजात वाजविण्यात आल्याचा दावा त्या-त्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी केला आहे. मात्र डेसिबल परिमाण मोजणार्या मशिनच गणेश विसर्जन उत्सवात अधिकारी व कर्मचार्यांकडे नसल्यामुळे पोलिसांनी नक्की काय मोजले, असा प्रश्न उपस्थित होतो.
काल ड्राय डे असतानाही जिल्ह्यात खुलेआमपणे दारुची विक्री केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग जिवंत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. काल सातारा पोलीस उप अधीक्षक गजानन राजमाने हे बंदोबस्तामध्ये व्यस्त असतानाही त्यांनी सातार्यातील एका बड्या हॉटेलवर अवैध दारुविक्री प्रकरणी कारवाई केली. त्यामुळे राजमानेंचे वेगवेगळ्या क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. असे असताना मात्र जिल्ह्यात दारुविक्री जोमात सुरु होती. अनेक कार्यकर्ते ‘टल्ली’ होवून गणेश विसर्जन मिरवणुकीत बेभान होवून नाचत होते. मात्र डॉल्बीच्या नादात पोलिसांनी अवैध दारुविक्रीकडे कानाडोळा केल्यामुळे अनेकांनी तर्रर होवून गाड्या दामटल्या. मात्र ब्रिथ ऍनालायझर मशिनचा काल वापर झालाच नाही.
पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी आपले सर्व लक्ष सातारा शहरावर केंद्रित केल्यामुळे ते आयजी असलेल्या परिक्षेत्रात मात्र डॉल्बी तुफान दणाणला. कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, सातारा जिल्ह्यातील काही शहरांमध्ये पोलिसांनी कानाडोळा केल्यामुळे डॉल्बी अखेर वाजलाच. त्यामुळे नांगरे पाटलांचा सातारा सोडला तर परिक्षेत्रात अंमल चालला नाही, असे चित्र काल मध्यरात्रीपर्यंत दिसून आले. त्यामुळे जब तक रहेगा गणपती, तब तक बजेगी डॉल्बी, हे उदयनराजेंचे आव्हान नांगरे पाटलांनी लिलया मोडून काढले असले तरी कोल्हापूर परिक्षेत्रात मात्र अंमलबजावणीची पाटी कोरीच राहिल्याचे चित्र काल लोकांनी पाहिले.
आ. शिवेंद्रराजेंमुळे मिरवणुकीत ‘जान’
काल सकाळी सातार्यातून गणेश विसर्जन मिरवणुकांना जिल्हाधिकारी व नगराध्यक्षांच्या हस्ते सुरुवात झाली. दरवर्षी खा. उदयनराजे गोलबागेजवळील स्टेजवर उभे असतात. शुभेच्छा स्विकारत गणेश मंडळांना प्रोत्साहित करीत असतात. मात्र काल सकाळपासूनच खा. उदयनराजे ना सातार्यात दिसले, ना गणेश विसर्जन मिरवणुकीत. त्यामुळे खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी ‘बच्चन कुठंय?’ अशी कुजबुजायला सुरुवात केली. मात्र पहाटेपर्यंत गणेश विसर्जन संपेपर्यंत खा. उदयनराजेंचे दर्शन सातारकरांना झालेच नाही. त्या उलट आ. शिवेंद्रराजेंनी नगर विकास आघाडीतर्फे राजपथावर स्वागत मंडपात ते मंडळांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. केवळ उपस्थितीच न दर्शविता ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ते थिरकलेसुद्धा. आ. शिवेंद्रराजेंच्या डान्समुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र दिसत होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |