06:53pm | Feb 07, 2019 |
सातारा : वेळे, ता. वाई येथे मुंबईहून उटी (कर्नाटक) कडे नायट्रिक ऍसिडने भरलेला टँकर आज सकाळी साडेआठच्या दरम्यान एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला होता. ऍसिडचा टँकर पलटी झाल्यानंतर टँकरमधून पिवळ्या रंगाचा उग्र वायू बाहेर पडू लागल्याने काहीवेळ अशियाई महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. दरम्यान स्थानिक प्रशासनाला पुणे येथून ‘एनडीआरएफ’च्या टीमला करावे लागले पाचारण करावे लागले. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, मुंबईहून उटी (कर्नाटक) कडे क्र. एमएच 43- यु 4260 हा नायट्रिक ऍसिडने भरलेला टँकर खंबाटकी घाट उतरुन भुईंजच्या दिशेने येत असताना एका तीव्र वळणावर ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाला. पुढेच छोटीशी दरी होती मात्र अलिकडेच टँकर पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना घडल्यानंतर तत्काळ भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी आग लागण्याची शक्यता असल्यामुळे त्याठिकाणी लोकांना येण्यास मज्जाव करुन अग्निशामक दलाला पाचारण केले. टँकर पलटी झाल्याने त्यात असणारे नायट्रिक ऍसिड बाहेर येवून पिवळ्या रंगाचा उग्र वासाचा धुर बाहेर पडत होता. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने पुणे येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले. एनडीआरएफची टीम व स्थानिक पोलिसांचे टँकर बाजुला हटविण्यासाठी सकाळपासून प्रयत्न सुरु होते. अखेर दुपारी हा टँकर बाजुला हटविण्यात यश आले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |