02:17am | Jan 11, 2019 |
सातारा : मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहराला इतिहासकालीन वस्तू आणि वास्तूंचा गौरवशाली वारसा लाभला आहे. सातारा शहरात ऐतिहासिक छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयासाठी जिल्हा क्रीडा संकुलाशेजारील शासकीय जागेत भव्यदिव्य आणि ऐतिहासिक सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशी भुईकोट (जमीनीवरील गड) प्रकारातील वास्तू उभारण्याचे काम सुरु आहे. या इमारतीच्या दुसर्या टप्प्यातील कामास बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाने तातडीने सुरुवात करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. दरम्यान, संग्रहालयाच्या तीसर्या टप्प्यासाठी सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये निधीची गरज असून राज्य शासनाने हा निधी तातडीने द्यावा. कोणत्याही परिस्थितीत संग्रहालयाचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. प्रसंगी रस्त्यावरही उतरु, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाला दिला आहे.
सातारा शहरात छ. शिवाजी संग्रहालय आहे. मात्र या जुन्या इमारतीमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने आणि इमारत तोकडी असल्याने पर्यटकांची गैरसोय होत असते. त्यामुळे संग्रहायलाच्या नवीन इमारतीला मंजूरी आणि निधी मिळवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरवा करुन हे काम सन 2008 मध्ये मंजूर करुन घेतले होते. दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून इमारत उभी राहिली पण, पुढील काम निधी अभावी रखडले होते. दुसर्या टप्प्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्यानंतर या टप्प्यातील काम तातडीने सुरु होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, उपअभियंता आर. टी. अहिरे, मोहसीन मोदी, शाखा अभियंता रवी आंबेकर, दिग्विजय वंजारी, शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक सुर्वे यांच्यासह संग्रहालयाचे काम करणारे ठेकेदारही उपस्थित होते.
काम मंजूर झाल्यानंतर संग्रहालयाचे काम तीन टप्प्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यातील इमारत उभारणीचे काम पुर्ण झाले आहे. त्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेला 8 कोटी 37 लाख निधी खर्च झाला आहे. दरम्यान, दुसर्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपये निधी नोहेंबर 2017 मध्ये मंजूर करुन घेतला होता. हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून इमारतीच्या आतील ङ्गर्निचर, अंतर्गत सजावट यासह संग्रहालय परिसरात बाग बगीचा निर्माण करणे आणि संग्रहालय परिसरात उपहारगृह, विश्राम गृह, तिकीट बुथ, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. निधी उपलब्ध झाला असून टप्पा क्र. 2 मधील कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाला दिल्या असून कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे उपस्थित अधिकार्यांनी सांगितले.
टप्पा क्र. 3 मध्ये संग्रहालयाच्या इमारतीला आतून आणि बाहेरुन रंगकाम करणे, ङ्गरशी बसवणे, दरवाजे खिडक्या बसवणे. तळमजल्यात दोन गेस्ट रुम, रेकॉर्ड रुमचे काम करणे. इमारतीस ङ्गायर स्टेयरकेस बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये निधीची गरज आहे. इस्टीमेट झाले असून सदर प्रस्ताव बांधकाम विभागाने तातडीने पुरातत्व विभागाकडे पाठवावा. निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पाठपुरावा करु. टप्पा क्र. 2 मधील इमारतीच्या आतील ङ्गर्निचर, अंतर्गत सजावट यासह संग्रहालय परिसरात बाग बगीचा निर्माण करणे हे काम पुरातत्व विभाग करणार आहे तर, उपहारगृह, विश्राम गृह, तिकीट बुथ, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते ही कामे बांधकाम विभाग करणार आहे. बांधकाम विभागाला सुचीत केल्याप्रमाणे त्यांचे काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे पुरातत्व विभागानेही त्यांच्या अखत्यारीतील काम तातडीने सुरु करावे, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.
ऐतिहासिक सातारा शहरात इतिहासकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी अद्ययावत, प्रशस्त आणि भव्यदिव्य अशा नवीन संग्रहालयाची निर्मीती होत आहे. तमाम सातारकरांसाठी हा जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने टप्पा क्र. 2 मधील कामे लवकर सुरु करुन तातडीने पुर्ण करावीत आणि टप्पा क्र. 3 मधील कामांसाठी येत्या महिनाभरात निधी उपलब्ध करुन द्यावा. हे काम पुर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरु आहेच आणि हे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुर्ण केले जाईल. त्यामुळे बांधकाम आणि पुरातत्व विभागाने दिरंगाई करु नये तसेच राज्य शासनानेही तातडीने उर्वरीत निधी उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |