04:59pm | Oct 11, 2019 |
सातारा : सातारा शहरालगत शाहूनगर हा त्रिशंकू भाग असून या भागात ज्या काही सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, त्या फक्त बाबाराजेंच्या माध्यमातूनच. हद्दवाढी सारखा महत्वाचा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंच्या माध्यमातून सुटला आहे. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होईल हे निश्चित आहे. त्यामुळे गोडोली, शाहूनगर, रामराव पवार नगर, विसावा नाका या भागातून दोन्ही राजेंना मताधिक्य देऊन विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त करुण बाबाराजेंसाठी काहीपण..! असे म्हणत त्रिशंकू भागातील नागरिकांनी कमळाला पाठिंबा दर्शवला.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी मोनार्क हॉटेल चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. एमजेपी ते एस.टी. कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बझार, जगताप हॉस्पिटल, कोल्हाटी वस्ती मस्जिद ते मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, अभयसिंहराजे भोसले कमान ते हायवेने म्हस्के वाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, मोरे पतसंस्था, गोडोली जकात नाका या मार्गावर झालेल्या या पदयात्रेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अमोल मोहिते, जनार्दन जगदाळे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, धनंजय जांभळे, शेखर मोरे पाटील, मनीषा काळोखे, प्रकाश बडेकर, नासिर शेख, राजू गोरे, सचिन सारस, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, सौ.स्नेहा नलवडे,सौ.सुनीता फरांदे, प.स.सदस्य आशुतोष चव्हाण,अमित महिपाल, धीरज घाडगे, राजीव शिर्के, युवराज माटेकर, रणजीत साळुंखे,व्यंकटराव मोरे, संतोष साळुंखे, योगेश जगताप, रवी पवार, महेंद्र देसाई, पप्पू घोरपडे, अमोल नलावडे, नितीन सूर्यवंशी, सागर साळुंखे, रोहन घोरपडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि रांगोळी काढून त्यांचॆ उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. युवक आणि युवतींनी शिवेंद्रसिंहराजे यांचे स्वागत करत सेल्फी साठी गराडा घातला. भाजपशिवाय विकास नाही त्यामुळे 'हम भाजप के साथ, हम बाबाराजे के साथ' अशी घोषणाबाजी युवकांनी यावेळी केली.
या वेळी नागरिकांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सातारा शहरालगत शाहूनगर, विसावा नाका, शाहूपुरी ही उपनगरे आहेत पण हा भाग त्रिशंकू असल्याने याठिकाणी विकासकामे करण्यासाठी नेहमीच मर्यादा पडत होत्या. त्यातूनही मी आमदार फंड, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सोयी सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता हद्दवाढीचा प्रश्न निकाली निघाला असून त्याचा फायदा या भागात विविध विकासकामे करण्यासाठी होईल. या भागात आगामी काळात विकासाचा झंजावात सुरु होणार असून त्यासाठी सर्वांनी भाजपच्या कमळाला निवडून द्यावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
शनिवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता मोती चौक, मारवाडी चौक, सम्राट चौक, ५०१ पाटी, देवी चौक, वेलणकर बोळ, गुरुवार परज, शेटे चौक, कमानी हौद, एलबीएस कॉलेज, बाटा दुकान, मैलावि ते नासिरभाई शेख घर ते अमरदादा जाधव घर या मार्गावर पदयात्रा निघणार आहे. पदयात्रेला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६ ते ८ यावेळेत फुटका तलाव आणि ८ ते १० यावेळेत गारेचा गणपती येथे कोपरा सभा होणार असून सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |