सातारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयातील लिपीक अंबादास गोविंद कदम (वय 31, मूळ रा.धनकवडी, पुणे सध्या रा.राजवाडा परिसर, सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. 1 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांना शासकीय अनुदानाची रक्कम धनादेशद्वारे (चेक) मिळणार होती. तो धनादेश बँकेत पाठवण्यासाठी तक्रारदार हे अंबादास कदम याला भेटले. संबंधित धनादेश बँकेत पाठवण्यासाठी कदम याने 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी एसीबी विभागात तक्रार केली. पडताळणी केल्यानंतर पैशांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारणार असल्याने एसीबी विभागाने ट्रॅप लावला. लिपीक अंबादास कदम याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. संशयिताला ताब्यात घेवून त्याला एसीबी विभागात आणले. सातार्यात ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शासकीय विभागात खळबळ उडाली. दरम्यान, रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ताटे, काटकर, खरात, सपकाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |