सातारा : सातार्यातील गुरुवार पेठेत राहणार्या मुनीर अब्दुलगैब पट्टणकुडे यांचे विकास बाळासाहेब म्हस्के (रा.सिंहगडारोड, पुणे) याच्यासह पैलवानांनी अपहरण करुन 21 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अन्य संशयितांमध्ये सातार्यातील काही पैलवानांचा समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मुनीर पट्टणकुडे हे पत्नी फरजाना व इतर कुटुंबियासमवेत राहण्यास आहेत. 2016 मध्ये पट्टणकुडे यांची पुणे येथील सिंहगडरोडवर राहणार्या म्हस्के याच्याशी शासकीय एलईडी बल्ब विक्रीच्या कारणावरुन ओळख झाली. म्हस्के याने 5 लाख रुपये डिपॉझीट भरुन एजन्सी घ्या, असे पट्टणकुडे यांना सांगितले. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने पट्टणकुडे यांनी एजन्सी घेण्यास नकार दिला. यानंतर म्हस्के याने कमिशन बेसीसवर बल्ब विकण्यास पट्टणकुडे यांना दिले होते. बल्ब विक्रीतून आलेली अडीच लाख रुपयांची रक्कम पट्टणकुडे यांनी बडोदा येथील हेलेक्स या कंपनीच्या खात्यावर वेळोवेळी भरली.
बल्ब विकल्यानंतर त्यापोटी 25 टक्के कमिशनप्रमाणे पट्टणकुडे यांनी म्हस्के याच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी म्हस्के याने बल्ब विकलेल्या ग्राहकांची यादी व त्यांची लाईटबिले जमा केल्याशिवाय कमिशन देणार नाही, असे पट्ठणकुडे यांना सांगितले. बल्ब विकताना अशी कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याच्या कारणावरुन पट्टणकुडे व म्हस्के यांच्यात वाद झाला. या वादानंतर म्हस्के हा वारंवार फोन करुन पट्टणकुडे यांच्याकडे लाईटेबिले जमा केली नसल्याने 21 लाख रुपयांचे नुकसान झाले असून ते भरुन देण्याची मागणी म्हस्के वारंवार करु लागला.
विकलेल्या बल्बचे कमिशन देण्याऐवजी म्हस्के 21 लाख रुपये मागत असल्याने पट्टणकुडे हे त्रस्त झाले होते. दि.14 फेब्रुवारी नंतरच्या काळात म्हस्के हा पट्टणकुडे यांच्या घरी जावून वारंवार कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत 21 लाखांची मागणी करु लागला. यासाठी म्हस्के याने सातार्यातील काही पैलवानांची मदतही घेतली. वारंवार होत असलेल्या या त्रासामुळे पट्टणकुडे कुटुंबिय कंटाळले होते.
दि. 24 जून रोजी सकाळी म्हस्के याने पट्टणकुडे यांना फोन करुन तालीम संघाजवळ बोलावून घेतले. त्यानुसार पट्टणकुडे हे स्वीफ्ट कारमधुन गेले यावेळी म्हस्के सोबत अनोळखी पैलवान होते. म्हस्के याने पैलवानांच्या मदतीने पट्टणकुडे यांना त्यांच्याच स्वीफ्ट कारमधून बॉंबे रेस्टॉरंट चौकात नेले. याठिकाणी म्हस्के याने तुला दिलेली वेळ संपली असून 21 लाख रुपये न दिल्यास कुटुंबियांसोबत जीवे मारण्याची धमकी दिली.
याठिकाणाहून सुटका करुन घेत पट्ठणकुडे हे घरी परतले. कुटुंबियांसोबत त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून म्हस्केसह अनोळखी पैलवानाविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरुन संशयितांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |