सातारा : सातारा शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते, हा प्रश्न सातार्यातील जनतेला अनेकदा पडलेला असतो. त्यातच दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी चालवित असल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत असतात. संध्याकाळी येथील राजपथावर धुमस्टाईल बाईकर्स धुमाकूळ घालीत असतात. त्यामुळे सातारा वाहतूक पोलीसांची डोकेदुखी वाढलेली आहे. गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेने नियमबाह्य नंबरप्लेट व ‘मॉडिफाईड’ दुचाकींचे फोटो काढून पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही नागरिकांनी पाठविलेल्या फोटोंवरून आज वाहतूक शाखेने चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असल्यामुळे सातारकरांची अघोषित नाकाबंदी झाली आहे. जवळच्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी सुद्धा सातारा शहराला फेरफटका मारावा लागतो. त्यामुळे सातारा शहर वाहतूक शाखेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. पावसामुळे रस्त्यांची पूर्णत: दैना झालेली आहे. असे असुनसुद्धा सातार्यातील एका व्यावसायिकाला धुम बाईकर्सच्या धडकेमुळे हाकनाक आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे सातारा शहरात या धुम बाईकर्सच्या विरोधात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार सातारा शहर वाहतूक विभागाने ‘मॉडिफाईड’, फॅन्सी नंबरप्लेट तसेच धुम स्टाईल दुचाकी चालविणार्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन सातारा शहरातील नागरिकांना केले होते. त्यानुसार काही सजग नागरिकांनी अशा दुचाकींचे फोटो सातारा शहर वाहतूक शाखेला व्हॉटसऍपद्वारे पाठविले होते. त्यानुसार वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सापळा लावून अशा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, वाहतूक शाखेने आवाहन करुनही काही धुम बाईकर्स रात्रीच्या वेळी पोलिसांना चकवा देत वेगात दुचाकी चालवित असतात. त्यामुळे अशा धुम बाईकर्सना पकडणे सातारा शहर वाहतूक शाखेसमोर आव्हान ठरत आहे. त्यामुळे याबाबत वाहतूक शाखेला कडक पावले उचलावी लागणार आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |