सातारा : कोंडवे (ता.सातारा) येथील जमीनीचा असित्त्वात नसलेल्या उतार्याच्या मदतीने जमीनीचा विक्री व्यवहार करणार्या कोंडवे (ता.सातारा) येथील अरुण उर्फ शरद वसंत बोडके, जयश्री वसंत बोडके याच्यासह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यातील अरुण बोडके हे माजी सरपंच असल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच अरुण उर्फ शरद बोडके, जयश्री अरुण बोडके (दोघे रा. कोंडवे), सुनंदा दत्तात्रय जाधव, प्रदीप दत्तात्रय जाधव (रा.विकासनगर, खेड) या चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्ररणी संतोष सर्जेराव घाडगे (वय 50, रा. मरळोशी ता.पाटण) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संतोष घाडगे यांची कोंडवे येथील शरद बोडके , नटराज शिंदे यांच्याशी ओळख आहेे. 2015 मध्ये नटराज शिंदे यांनी मी माझे दाजी कोंडवे येथील साडेचार गुंठे जागा विकत घेणार असल्याचे तक्रारदार घाडगे यांना सांगितले. हे सांगतानाच शिंदे यांनी ‘तु जागा घेणार असल्यास घे,’ असेही सांगितले. त्यानुसार घाडगे यांनी दीड गुंठे जागा घेण्याची तयारी दर्शवली. जमिनीबाबत बोडके व इतरांनी पुढील कार्यवाही सुरु केली. संबंधित जागा खेड, विकासनगर येथील सुनंदा दत्तात्रय जाधव यांची असल्याचे घाडगे यांना सांगण्यात आले व त्याबाबतचा कोंडवे ग्रामपंचायतीचा जमिनीचा उतारा घाडगे यांना दाखवण्यात आला.
दीड गुंठा जागेसाठी 6 लाख 50 हजार रुपये लागणार असल्याचे सांगितल्यानंतर तक्रारदार घाडगे यांनी चेक तसेच रोख स्वरुपात सहा लाख रुपये शरद बोडके याला टप्प्याटप्याने दिले. पैसे दिल्यानंतर गोडोली येथील उपनिबंधक कार्यालयात दि. 25 सप्टेंबर 2015 मध्ये त्याबाबतचा दस्त करण्याची तयारी बोडके याने केली. यावेळी त्याठिकाणी नटराज शिंदे, सुनंदा जाधव व इतर काही जण उपस्थित होते. दस्त तयार करताना त्यावर दाखविलेली रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर घाडगे यांनी त्यास आक्षेप घेतला. यावरुन किरकोळ वाद झाल्यानंतर बोडके याने उर्वरित रक्कम परत देतो, असे घाडगे यांना सांगितले. दस्त नोंदणी झाल्यानंतर काही दिवसांनी घाडगे यांनी तो दस्त नोंदणीसाठी कोंडवे ग्रामपंचायतीस दिला. दस्त नोंदणीस दिल्यानंतर घाडगे यांनी नोंदीबाबत माहिती घेण्याचे काम सुरु केले. यादरम्यान त्यांना खरेदीदस्तावेळी वापरलेला जमिनीचा उतारा ग्रामपंचायतीच्या दप्तरात नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर घाडगे यांनी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामंचायतीकडून माहिती मागवली. यानुसार संबंधित उतारा बनावट असल्याचे व त्याची नोंद ग्रामपंचायतीत नसल्याचे लेखी उत्तर घाडगे यांना देण्यात आले.
फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्याने घाडगे यांनी पैसे देण्याबाबत शरद बोडके याच्या मागे तगादा लावला. प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देत बोडके याने घाडगे यांना टाळले. बोडके याने पत्नी जयश्री बोडके यांच्या नावे असणारा शिक्षक बँकेच्या 6 लाख 50 हजार रुपयांचा चेक घाडगे यांना दिला. तो चेक न वटल्याने घाडगे यांनी बोडके यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे सोमवारी रात्री घाडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द तक्रार दिली. याचा पुढील तपास उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |