11:32pm | Apr 02, 2018 |
सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यांविरुध्द तीव्र मोहिम उघडली असून सोमवारी दिवसभरात सात ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 11 जणांना अटक करुन सुमारे 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी त्या त्या परिसरात कारवाई केल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली होती.
अमोल जाधव, विजय येवले, राजेश पुणेकर, विजय जाधव, अनिरुध्द वायदंडे, सागर शिंदे, दत्ता पवार, अक्षय वाघमारे, समीर कोतवाल, शंकर भोसले, झाकीर हुसेन शेख (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील लक्ष्मी टेकडी, हॉटेल पालवी पाठीमागील परिसर, कोडोली, एलबीएस कॉलेजमागील परिसर, तेली खड्डा याठिकाणी बिनधोकपणे जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची चार पथके करुन पोलिसांनी परिसरात छापा टाकल्यानंतर अनेक संशयितांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळाचे पंचनामे केले. सर्व संशयितांनी पोलिस व्हॅनमध्ये घातल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. संशयितांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरु होती.
पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजू पुजारी, अनिल स्वामी, निलेश गायकवाड, शिवाजी भिसे, अमित यादव, ज्योतीराम पवार, अशोक माने या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, सातारा शहर परिसरात ज्या ठिकाणी जुगार, मटका व्यवसाय सुरु आहे त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोनि सारंगकर यांनी केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |