आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या जवळ यमुना एक्स्प्रेस-वे वर आज सोमवारी पहाटे बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात २९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५-१६ प्रवासी जखमी झाले आहेत. आतापर्यंत २७ मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लखनौ येथून दिल्लीच्या दिशेने जात होती. मात्र, ती यमुना एक्स्प्रेस वे दरम्यान झरना नाल्यात ५० फूट खोलवर कोसळली. या बसमधून सुमारे ५० लोक प्रवास करत होते. यातील २९ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना एत्मादपूर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस अवध डेपोची होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी बचावकार्यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना त्यांनी केली आहे. सहा पदरी असलेला यमुना एक्स्प्रेस वे १६५ किलोमीटर लांब आहे. हा एक्स्प्रेस वे ग्रेटर नोएडाला आग्र्याशी जोडतो. या मार्ग २०१२ मध्ये बनविला होता.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |