सातारा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीविरूध्द मोहीम उघडण्यात आली होती. त्यामध्ये 4 हजार 576 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 1 हजार 144 वाहन चालकांनी शासकीय नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून कारवाईपोटी सुमारे 1 कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 अखेर जिल्ह्यात विविध अवैध प्रवासी वाहतुकीविरूध्द मोहीम उघडण्यात आली होती. हॉर्न तपासणी मोहिमेत जिल्ह्यात 2 हजार 888 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 722 वाहने दोषी आढळून आली. क्रॅशगार्ड अंतर्गंत 50 वाहनांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 12 वाहने दोषी आढळले. त्यांच्याकडून 7 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
रात्र तपासणी मोहिमेत 1 हजार 104 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 201 वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून दंडापोटी 5 लाख 70 हजार 600 रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली. 121 नवीन अॅटा ेरिक्षांना परवाने देण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 18 विधवा महिलांना रिक्षाचे नवीन परवाने देण्यात आले.
क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणार्या 3 हजार 288 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 822 वाहने दोषी आढळले. तर 690 वाहने जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडून 1 कोटी 31 लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. एका वायुवेग पथकामार्फत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 39 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला तर 6 कोटी 3 लाख रुपये कर वसूल करण्यात आला. आकर्षक नंबरसाठी 5 हजार 230 वाहनांमधून 3 कोटी 71 रूपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे धायगुडे यांनी सांगितले. 1 कोटी 33 लाख रुपयांची पर्यावरण कर वसुली करण्यात आली. व्यवसाय कर वसुली 1 कोटी 12 लाख रुपये करण्यात आली. महसूल वसुली 118 कोटी 98 लाख रुपये झाली.
वर्षभरात नवीन वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये मोटारसायकल 39 हजार 756, कार व जीप 5 हजार 361, टॅक्सी 248, अॅटोरिक्षा 377, प्रवासी वाहने 111, मालवाहू वाहन 2 हजार 126, इतर वाहने 2 हजार 464 असे मिळून 50 हजार 443 वाहनांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा 5 हजार 416 वाहनांची नव्याने भर पडली आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |