सातारा : राज्यातील बहुप्रतिक्षित जिल्हा परिषदांचे आगामी अडीच वर्षे कालावधीसाठीची आरक्षणे आज निश्चित झाली असून आज मंत्रालयात झालेल्या सोडतीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण (पुरुष) गटाला निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील अनेक मातब्बरांच्या आकांक्षा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी फलटणच्या संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची वर्णी लावण्यात आली होती. सुमारे अडीच वर्षे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यभार वाहिलेला आहे. नियमानुसार आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई येथील मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत चक्राकार पद्धतीने राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत खालीलप्रमाणे :
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |