02:05am | Sep 18, 2019 |
कराड : आम आदमी पार्टीच्यावतीने कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या तीन विधानसभा मतदार संघासह जिल्हयातील आठ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्यात येणार आहे. समविचारी लोकांना बरोबर घेवून ही निवडणूक लढणार असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मधुकर माने यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, आपचे सागर जाधव, सुरेश पाटील, आनंदराव थोरात, जर्नादन सुतार, सुरेश साठे यांची उपस्थिती होती.
डॉ. मधुकर माने म्हणाले, सध्या राज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार व महागाई वाढली आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास शासनाला सपशेल अपयश आले आहे. हे प्रमुख मुद्दे घेवून आम आदमी पार्टी सातारा जिल्हयात आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहे. समविचारी लोकांना व संघटनांना बरोबर घेण्यासाठी त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू आहे. अशा समविचारी लोकांना बरोबर घेवून आम आदमी पार्टी सातारा जिल्हयातील आठ विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू असून सक्षम उमेदवारांना उमेदवारी देणार असल्याचे डॉ. मधुकर माने यांनी सांगितले.
पंजाबराव पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी उध्दवस्त झाला आहे. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. याला शासनाचे चुकीचे धोरणच कारणीभूत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी लोकांना बरोबर घेवून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. याबाबत बळीराजा शेतकरी संघटना येत्या दोन-चार दिवसात बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करेल असे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |