02:51am | Sep 28, 2018 |
वाई : एका मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असलेल्या लातुर जिल्ह्यातील व्हीटीपी ( व्हेकशनल ट्रेनिंग प्रोग्रँम ) परवाना धारक संस्थेच्या नावाखाली गेली दोन वर्षापासुन वाईत कृष्णाई बहुउद्देशीय महिला मंडळ नावाने केंद्र सुरू करून बनावट कागदपत्राच्या अधारे चालवल्या गेलेल्या केद्रांचा पर्दाफाश माहितीच्या अधिकारात मागवल्या गेलेल्या माहितीतुन उघड झाला आहे. वाईसह जिल्ह्यात अशी किती बोगस केंद्र सुरू आहेत ? याविषयी आता उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिका-यांच्या हितसंबधातुन वाईत हे बोगस केंद्र सुरू असल्याचेही माहितीच्या अधिकारातुन स्पष्ट झाले असुन शासनाचे लाखो रूपये संगनमताने लाटणा-या लातुरच्या या ' संस्थेसह वाईतील ' त्या ' दोन केंद्रचालक महिला, व संबंधित अधिका-यांवर फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान या बोगस संस्थेला आता ' ब्लॅक लिस्ट ' मध्ये टाकण्याचे आदेश विकास कौशल्य विभागाचे उपसंचालक श. बा. अंगणे दिले असुन तसा अहवाल त्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी , मुंबई यांना पाठवला आहे.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवती, निराधार महिलांसाठी विविध कोर्सेसच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक विकास साधता यावा यासाठी शासन स्तरावर विकास कौशल्य विभागातंर्गत प्रत्येक तालुक्यात व्हेकशनल ट्रेनिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातून सहा- सहा महिन्याचे मोफत ब्युटी पार्लर, फॅशन डिजाईनिंग, कॅम्प्युटरचे विविध कोर्सेस आदी पंन्नास हुन अधिक विविध कोर्सेसचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी युवती व महिलांना दिले जाते. विशेषतः दारिद्र रेषेखालील युवतींना या कोर्सेससाठी विशेष प्राधान्य दिले जाते.नगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या युवती व महिलांना नोंदणीकृत परवानाधारक केंद्राकडे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. त्यानंतर त्याची परिक्षा घेऊन उत्तीर्ण परिक्षार्थीना प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्राच्या आधारे त्या युवती, महिला स्वतःचा व्यवसाय अथवा कुठेही नोकरी करू शकतात. ही शासनाची त्यामगची भुमिका आहे. परंतु माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून अशा बोगस केंद्रातुन या परिक्षार्थीना खरं ज्ञान मिळतं का ? याविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार दरवर्षी शासनाकडुन अशा विविध कोर्सेससाठी करोडो रूपये प्रशिक्षण देणा-या संस्थाना दिले जातात. राज्यात अशा प्रशिक्षण देणा-या शेकडो संस्था आहेत. त्यापैकी अधिकृत किती ? आणि बोगस किती ? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक ' व्हीटीपी ' परवाना मिळवण्यासाठी खुपच जाचक अटीची पुर्तता करावी लागते. जागा, त्या जागेचा मंजुर नकाशा, लाईट बिल( ते ही शासन नियमानुसार पॉईंट ५ एवढेच ) , त्या जागेचा सिटी सर्व्हे उतारा, करारनामा तो ही नोटराईज, केंद्र चालवणा-या महिलेचं संबंधित कोर्सचे शासनमान्य प्रमाणपत्र, बारावी उत्तीर्णी प्रमाणपत्र, प्रशिक्षार्थीना शिकवणा-या शिक्षकांचे त्या - त्या कोर्सेसचे शासनमान्य प्रमाणपत्र तसेच शिकवण्यासाठी व प्रत्यक्ष सराव करण्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य त्या केंद्राच्या ठिकाणी असणे अपेक्षित आहे. कौशल्य विभाचे अधिकारी जेव्हा या केंद्रांची पहाणी करतात आणि नियमानुसार जर सर्व आवश्यक तांत्रिक गोष्टीची त्याठिकाणी पुर्तता केली असेल तर संबंधित अधिकारी तसा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवतो आणि त्यानंतर संबंधित केंद्रांला कोर्सेची परवानगी दिली जाते . परंतु काहींनी राजकीय ताकद वापरून तर काहींनी अधिका-यांशी ' आर्थिक ' हितसंबंध प्रस्थापित करून ' व्हीटीपी ' परवाना मिळवल्याचे आता उघड झाले आहे. मात्र यामुळे योग्यता व गुणवत्ता असणा-या संस्थांना किरकोळ तांत्रिक अडचणी दाखवुन डावलं गेल्याची ही माहिती आता पुढे आली आहे.
वाईत गेली दोन वर्षापासुन वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलुन लातुरच्या या संस्थेने त्या मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असेलेल्या व्हीटीपी परवाना धारक संस्थेच्या नावाखाली केंद्र चालवणा-या वाईतील काही मंडळीनी बोगस कागदपत्राच्या अधारे व त्या मंत्र्याच्या नावाचा वापर करून आणि कौशल्य विभागाच्या अधिका-यांच्या विशेष मेहरबानीमुळे केंद्र चालवण्याची परवानगी घेऊन शासनाच्या लाखो रूपयांवरती अक्षरशः डल्ला मारला आहे. परजिल्ह्यातील या संस्थेची वाईसह संबंध महाराष्ट्रात किती केंद्र सुरू आहेत ? याचाही शोध घेणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यानी सांगितले आहे.
वाईत दोन वर्षापासून सुरू असलेल्या केंद्राची माहिती, माहिती अधिकारात मागवल्यानंतर धक्कादायक माहिती उजेडात आली असुन त्यामध्ये जागेचा करारनामा, नकाशा, केद्रचालकांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शिकवणा-या शिक्षक महिलेचे प्रमाणपत्र, यासह बोगस साहित्येची माहिती आढळून आली आहे. दोन वर्षात शेकडो युवतीनी या केंद्रातुन ब्युटीपार्लर, फॅशन डिजाईनचे प्रशिक्षण घेतले आहे. खरंच त्याना अशा बोगस केंद्रातुन योग्य शिक्षण मिळाले असेल का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. वाई सारख्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेल्या शहरात अशा प्रकारे बनावट कागदपत्राच्या आधारे शासनमान्य कोर्सेस चालवुन शासनाची व त्या प्रशिक्षार्थीची फसवणुक करणा-या ' त्या ' केंद्चालक महिलांची, त्याना साथ देणा-या कौशल्य विभागाच्या ' त्या ' अधिका-यांवर आता तरी कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ् लागला आहे. व्हेकशनल ट्रेनिंग प्रोग्रँमच्या नावाखाली महाराष्ट्रात असंख्य बोगस संस्था शासनाने करोडो रूपये अधिका-यांच्या सहकार्यांने घशात घालत असल्याची माहिती उघड झाली असुन याची मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र समिती नेमुन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे जेष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी दिली आहे. सध्या वाईत काही संस्था कार्यरत आहेत त्याचीही तात्काळ चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
' तो ' मंत्री कोण ?
माहितीच्या अधिकारात वाईत बोगस केंद्र चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्यावर ती व्हिटीपी परवाना धारक संस्थाही आता संशयाच्या भोव-यात अडकली आहे. ज्याच्या नावे परवाना आहे ती व्यक्ती एक मंत्र्याची नातेवाईक असुन त्याच्या अधिकाराचा वापर करून महाराष्टात अशी असंख्य केंद्र चालवली जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड, लातुर असं या संस्थेचं कन्शेक्शन असुन कोणत्या मंत्र्याच्या नावाचा वापर करून हा गोरखधंदा सुरू आहे. याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |