02:24am | Jul 05, 2019 |
सातारा : येथील सदरबझार परिसरात भीमाबाई आंबेडकरनगर येथे वडापावचे पैसे देण्याच्या कारणातून प्रथम वडापाव गाडाचालक अस्लम बन्सी सय्यद याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्यातून उद्भभवलेल्या भांडणातून पुन्हा दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात वडापावचा गाडाही फोडण्यात आला असून या हाणामारीत दोघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून या भांडणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी आठजणांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सदरबझार येथील भीमाबाई आंबेडकरनगर येथे असलेल्या महाराजा वडापाव सेंटर येथे विशाल बाळू भिसे वय 23, प्रकाश शिर्के, विक्रम साठे, गणेश काळू देवकुळे वय 25, विशाल मोहिते व इतर पाच ते सहाजण आले. त्यांनी गाडाचालक अस्लम सय्यद यास येथे गाडा लावायाचा असेल तर आम्हा फुकट वडापाव द्यावा लागेल असे धमकावत शिवीगाळ केली. त्यानंतरही वडापाव न दिल्याने आरोपींनी तिथे असलेल्या मौलाअली डोंगरे, प्रकाश कांबळे, अल्लाबक्ष शेख यांना शिवीगाळ करत हाताने व दांडक्याने मारहाण करत वडापावाचा गाडाही फोडला तसेच गल्ल्यातील 1200 रुपये चोरुन नेल्याची तक्रार अस्लम शेख याने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
तर मौल्लाली जमादार डोंगरे वय 29, अल्लाबक्षी लालासाहेब शेख वय 27, प्रकाश हणमंत कांबळे वय 22, शरणाप्पा मल्लाप्पा कांबळे वय 25, अस्लम बन्सी सय्यद वय 27 व शहेनशहा वली जमादार डोंगरे वय 24 सर्व रा. भीमाबाई आंबेडकरनगर या सर्वांनी मला व माझ्या साथीदारांना वडापावचे पैसे न दिल्याच्या कारणातून चिडून मौल्लाली जमादार डोंगरे याने कोयत्याने विशाल भिसे याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार विक्रम दिलीप साठे वय 28 रा. लक्ष्मीटेकडी सदरबझार याने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींनंतर विशाल बाळू भिसे, गणेश काळू देवकुळे, मौल्लाली जमादार डोंगरे, अल्लाबक्षी लालासाहेब शेख, प्रकाश हणमंत कांबळे, शरणाप्पा मल्लाप्पा कांबळे, अस्लम बन्सी सय्यद व शहेनशहा वली जमादार डोंगरे या आठजणांना अटक केली. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी भेट दिली असून या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक चौगुले करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |