01:08am | Aug 06, 2018 |
सातारा : बुधवारी भल्या पहाटे सातारा-लोणंद रस्त्यावर अमित भोसले (रा.अरबवाडी ता.कोरेगाव) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला असल्याचा बनावाचा अखेर पर्दाफाश झाला असून त्याचा खून झाल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश बाळकृष्ण भिलारे, त्याची पत्नी अर्चना भिलारे व निखिल उध्दव भिलार (तिघे रा.अरबवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमित व योगेश दोघे जीवलग मित्र असून योगेशला अमितवर पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यातूनच हे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मृत अमित याचा भाउ रमेश सुभाष भोसले (वय 27, रा.मु.अरबवाडी पो.बनवडी ता.कोरेगाव) याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 1 रोजी पहाटे अमित भोसले या युवकाचा सातारा- लोणंद रस्त्यावरील शिवथर येथील रस्त्यावर मृतदेह सापडला होता. प्राथमिक दर्शनी हा अपघातात असल्याचे भासवून त्याठिकाणी मृत युवकाची दुचाकीही आढळली होती. सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांना सुरुवातीला मृतदेह ओळखण्यात अडचण आली. मात्र मृत व्यक्ती अमित भोसले असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. दरम्यान, मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर अमितच्या कुटुंबिय व नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली. अमितचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदन करुन कुटुंबियांकडे देण्यात आला.
अमितचे पदवीधर शिक्षण झाले असून तो पूर्णवेळ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परिक्षा केंद्रात अभ्यास करत होता. अमितचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्याठिकाणीही हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाल्यानंतर पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजीत भोसले, सुहास पवार यांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न असा निर्माण झाला की अमित भोसले शिवथर रस्त्यावर भल्या पहाटे का व कशासाठी गेला होता? या प्रश्नाचे उत्तर मिळवताना पोलिसांना अडचणी येवू लागल्यानंतर त्यांनी मंगळवारी दिवसभराची घटना पाहिली व एकएक धक्कादायक माहिती समोर येत गेली.
सातारा तालुका पोलिसांना तपासामध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्याने त्यांनी तपासावर लक्ष केंद्रीत केले. गेली चार दिवस या घटनेचा तपास सुरु असताना त्यांनी मृत अमितचा भाउ रमेश याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. या माहितीमध्ये योगेश हा अमितचा मित्र असून त्याला अमितवर पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून दोघांमध्ये भांडणे झाले असल्याचेही समोर आले. यामुळे सातारा तालुका पोलिसांनी योगेशवर लक्ष केंद्रीत केले. मंगळवारी दिवसभर व बुधवार सकाळचे कॉलेजवरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता मंगळवारच्या फुटेजमध्ये योगेश त्याची पत्नी अर्चना भिलारे हे दोघे अमित भोसले याला दुचाकीवरुन घेवून जात असताना निदर्शनास आले.
यातील संशयित योगेेश व निखिल भिलारे या दोघांना शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील निखिल हा योगेशचा मित्र आहेे. प्राथमिक माहितीनुसार अमित भोसले याला कॉलेजमधून अरबवाडी येथे नेण्यात आले. तेथे योगेशने निखिल याला बोलावून घेतले. ठरलेल्या कटाप्रमाणे अमितला मारहाण करुन हात बांधून तेथून नेले. बुधवारी रात्री उशीरा त्याचा खून करुन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास योगेश घरी गेला असल्याची माहिती समोर आली आहेे. दरम्यान, रविवारी अर्चना भिलारे हिला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |