12:31am | Sep 04, 2018 |
सातारा: सातार्यातील एका नामांकित कंपनीचा बँकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सिम स्वाईप करून घेऊन कंपनीच्या बँक खात्यातील 37 लाख 78 हजार रूपये देशातील विविध राज्यातील बँक खात्यात ट्रानस्फर केले होते. या प्रकरणाच्या मूळाशी जात सातारा सायबर पोलिसांनी याप्रकरणी पंजाबमध्ये जाऊन दोघांना अटक केली. अभिषेक सुनील कुमार (वय 20, रा. पंजाब) व यादविंदर नरेंद्र सिंग (वय 34, रा. पंजाब) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरातील एका कंपनीच्या बँकेंच्या खात्यातील 38 लाख रूपयांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला होता. हे सायबर क्राईम असल्याने याच्या मुळाशी जाण्याचे पोलिसांनी ठरवले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पद्माकर घनवट, सपोनि गजानन कदम यांनी संशयित आरोपींची माहिती संकलित केली. या माहितीचे अवलोकन करून वरिष्ठांनी तात्काळ झिरकपूर पंजाब तपास पथक रवाना केले. या पथकाने पंजाब येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यामध्ये सहभागी असणार्या अभिषेक कुमार व यादविंदर सिंग यांना अटक केली.
त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोना विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, निखील जाधव यांचा पथकात सहभाग होता. तर शंकर सावंत, महेश शेटे, सचिन पवार, तुषार साठे, वर्षा खोचे, सुशांत कदम, अनिकेत जाधव, प्रवीण अहिरे, ज्योती कोंडावळे, यशोमती साळूंखे, गणेश कचरे व मारूती अडागळे यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यास सहकार्य केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |