09:10pm | Apr 25, 2020 |
सातारा : जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये कार्यरत असणार्या परिचारिकेचा (नर्स) कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. दरम्यान हा मृत्यू मेंदूला आलेल्या सूजेमुळे झाल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये कार्यरत असणार्या ज्योती राक्षे (वय 42) या परिचारिकेला कोरोना अनुमानित म्हणून कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान, तिने कोरोना संसर्गावर उपायकारक असणारी हायड्रॉक्सिक्लोरीक्विन या गोळीचे सेवन केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू त्यास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. तिच्या मेंदूला सूज आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. कालच संबंधित परिचारिकेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. यापूर्वी ज्योती राक्षे औंध, पुणे येथील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात कार्यरत होत्या. गेल्याचवर्षी त्यांची बदली सातार्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात झाली होती. दरम्यान, त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परिचारिकेच्या संदर्भातील ‘ती’ अफवाच!
सातार्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकेचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची अफवा आज सकाळपासूनच सोशल मीडियावर फिरत होती. मात्र, संबंधित परिचारिकेचा मृत्यू मेंदूशी निगडीत आजारामुळे झाल्याचे रुग्णालयीन प्रशासनाने आज दुपारी जाहीर केले असले तरी जिल्हा प्रशासनातील इतर कोणत्याही जबाबदार अधिकार्याने खात्रीशीर माहिती न दिल्याने या मृत्यूसंदर्भात सस्पेन्स वाढलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील बिनीचे अधिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देताना एकमेकांकडे बोट करीत असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचविण्यात माध्यमांना अडचणी येत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |