01:43am | Jul 16, 2019 |
कराड : इयत्ता दहावी विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक येणार्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून श्री संतकृपा गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात येते. हा पुरस्कार म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देवून त्यांच्या पंखात बळ देणारा ठरेल, असे प्रतिपादन कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले.
घोगांव (ता.कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेमार्फत गतवर्षी पासून श्री संतकृपा गुणवत्ता पुरस्कार हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख अतिथी कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे होते. त्यांच्याच शुभहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी यावेळी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात कराड, पाटण, शिराळा, शाहूवाडी या तालुक्यातील 35 माध्यमिक शाळेतील 100 यशस्वी विद्यार्थी पुरस्कार स्वीकारण्याकरीता उपस्थित होते.
यामध्ये दहावीत विद्यालयात मुलांमध्ये प्रथम, मुलींमध्ये प्रथम व मागासवर्गीयमध्ये प्रथम क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांना श्री संतकृपा गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. एक हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवनाथ ढवळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचा हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. पाठीवर थाप देवून त्यांच्या पंखात बळ देण्याचे अतिशय महत्त्वाचे व केलेल्या परिश्रमाचे चीज व त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून एक सामाजिक बांधीलकी जपली आहे.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून अभ्यास, सातत्य, जिद्द, चिकाटी, परिश्रम व प्रचंड आत्मविश्वास ही यशाची सूत्रे अंगिकारून मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते. प्रयत्न करूनही अपयश आले तर निराश होवू नका, अडचणीवर मात करून पुढे जा. यश निश्चित प्राप्त होते. यावर त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.
शालेय जीवनात महत्त्वाच्या वळणावर असताना सोशल मीडिया, व्हॉटसऍप, फेसबुक यापासून दूर रहा. आई-वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन घ्या. अभ्यास करून चांगले गुण मिळवण्यासाठी आथिर्र्क परिस्थिती गरजेची नसते. या परिस्थितीला दोष न देता अखंड परिश्रम करा. गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना अनेक सामाजक संस्था आर्थिक मदतीचा हात देत असतात.
जीवनात व्यसनापासून दूर रहा यातून विकृती निर्माण होते असा मौलिक सल्लाही शेवटी ढवळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव प्रसून जोहरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचवायची ताकद असावी लागते. आपण खूप प्रयत्नांती हे यश मिळवले आहे. भविष्यात करिअर करण्यासाठी हे परिश्रम अखंडपणे ठेवा. नक्कीच यशस्वी व्हाल.
तुम्हा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने खास अभिनंदन. तुमच्या पुढील शिक्षणकरता शुभेच्छा! या पुरस्कार सोहळ्यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सी.ई.ओ. प्रदिप कबाडे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.प्रज्ञा पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते संस्था परिसरात 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्या सुप्रिया पाटील यांनीकेले. प्राचार्य पुष्पा पाटील यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालक यांचे आभार मालने. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |