चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक; एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
सातारा : महानुभव मठासमोर एका ट्रेडर्सच्या दुकानातून 16 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून चोरीच्या घटनेनंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस बुचकळ्यात होते. मात्र अल्पवयीन मुलगा सापडल्यानंतर तो भितीपोटी बेपत्ता झाला असल्याची कबुली त्याने दिली आहे.
अजय भानुदास देशमुख (वय 20), संतोष नारायण चव्हाण (वय 20, दोघे रा.मतकर कॉलनी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 7 रोजी जयंतीलाल रावजी पटेल (रा.मोळाचा ओढा) यांच्या दुकानात चोरी झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या घटनेचा तपास करत असताना एका संशयिताचे नाव त्यांना समजले. मात्र त्याचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिस बुचकळ्यात पडले. अखेर तो मुलगा स्वत:हून समोर आल्यानंतर चोरीच्या भितीपोटी तो पसार झाला असल्याची कबुली त्याने दिली. संशयित अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या दोन्ही साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्या संशयितांचा शोध घेवून त्यांना अटक केली. चोरी केलेल्या साहित्याबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांनी तो मुद्देमाल पोलिसांना दिला. दरम्यान, पोनि मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर, फौजदार भोसले, पोलिस हवालदार हिंमत दबडे, हसन तडवी, शंकर गायकवाड, लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
महानुभव मठासमोर एका ट्रेडर्सच्या दुकानातून 16 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून चोरीच्या घटनेनंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस बुचकळ्यात