12:34am | Nov 19, 2018 |
वाई : जोश.. उत्साह ..अन् राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळांडुना पाहण्याची उत्सुकता.. यामुळे वाईची पहिली हिलसाईड मॅरेथॉन स्पर्धा ऐतिहासिक व स्मरणीय ठरली. भल्या पहाटे सुरू झालेल्या या स्पर्धेत केनिया व मांढरदेवच्या खेळांडुनी बाजी मारली. महाराष्ट्रातील नामांकित खेळाडूसह सुमारे दोन हजार स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. महिलांचा लक्षणीय सहभाग हे या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य ठरले.
सकाळी पहाटे सहा वाजता द्रविड हायस्कुलच्या मैदानावरएकवीस कि.मी. स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर पाच कि.मी. स्पर्धा सुरू झाली. सकाळी ८.३० वाजता तीन किमी या फन रनचा शुभारंभ वायू गरवारे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धकांचा जोश वाढविण्यासाठी संगीत, नृत्य, ढोल, लेझीम, आणि शिवकालीन चित्तथरारक प्रातिक्षके अशा जल्लोषी वातावरणाने स्पर्धकांमध्ये उत्साह संचारला होता.
या स्पर्धेमध्ये एकवीस किमी आंतरराष्ट्रीय गटात केनियाच्या सायमन टू प्रथम, फिक्स रॉप व्दितीय, तर एलीहा केमी याने त्रितीय क्रमांक पटकावला. तर भारतील गटात मांढरदेवचे आकाश हिरवे प्रथम, प्रतिक उंबरकर व्दितीय, हरिदास शिंदे त्रितीय आला. आंतरराष्ट्रीय महिला गटात केनियाच्या टीझीटा बेकर प्रथम, नवमी झरोंगे व्दितीय आल्या. भारतीय महिला गटात रेश्मा केवटे प्रथम, स्नेहल हिरवे व्दितीय, तर प्रमिला पाटील त्रितीय आल्या. निओ व्हेटरन- नाथा गरीनेकर प्रथम, व्दितीय मल्लिकार्जुन पारगे, त्रितीय- झुरेश चेहर, महिला गटात- दीपाली यादव, प्रथम, आश्विनी देव- व्दितीय, रंजिता गोळे- त्रितीय, सुपर व्हेटरनमध्ये पुरुष गटात मनोहर जेधे- प्रथम, कैलास माने- व्दितीय, तर रवींद्र जगदाळे- त्रितीय, महिला गटात डॉ. आशा बाबर- प्रथम आल्या. यांच्या सह पाच किमी व तीन किमी गटातील विजेत्या स्पर्धकांना गरवारे कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर- वायू गरवारे, आमदार मकरंद पाटील, व सौ. मयुरी गरवारे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी- कैलास शिंदे, गरवारे कंपनीचे प्रेसिडेंट-प्रमोद कामत, रावेन्द्र मिश्रा, प्लांट इंचार्ज-नितीन सरदेशपांडे, व्यवस्थापक- वैभव गरवारे, वाई अर्बन बँकेचे चेअरमन- चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष- राजेंद्र चावलांनी, आंतरराष्ट्रीय खेळाडू- कालिदास हिरवे, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार मकरंद पाटील म्हणाले, मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाई तालुक्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मातीत अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले असून, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील युवकांना आपल्या कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम ही काळाची गरज असून सुद्रुड शरीर व मनासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी गरवारे कंपनीचे चेअरमन- वायू गरवारे म्हणाले, कि सामाजिक उपक्रमात गरवारे कंपनी नेहमीच योगदान देत असते, शिक्षण व आरोग्याला कंपनीने प्राधान्य दिले आहे, मॅरेथॉन आयोजन करून संयोजकांनी वाई चा नावलौकिक वाढविला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संयोजन समितीचे अध्यक्ष- दीपक ओसवाल म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केले असून पुढच्या वर्षी यापेक्षा ही व्यापक स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धेसाठी इंडियन मेडिकल असोशियेषण आणि वाई केमिष्ठ व ड्रगीष्ट असोशियेषण यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या आयोजनात- रेस डायरेक्टर- राजगुरू कोचळे, उपाध्यक्ष- विजय पवार, सचिव- धोंडीराम वाडकर, नंदकुमार माने, प्रा. समीर पवार, शंकर वाघ, बळवंत बाबर, गिरीश गाढवे, विलास माळी, गोपाळ गरुड, महावीर कुपाडे, अमृत देशमुख, राजकुमार शिर्के, प्रशांत पोळ, शशिकांत जावळीकर, दत्तात्रय देसाई, शिवाजी निकम, संतोष शिंदे, नंदकुमार डोईफोडे, सुधीर जमदाडे, महेश कोचाळे, अजित वाडकर, मदन लोहार, ओमकार सपकाळ, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |