सातारा : सातारा शहरासह उपनगरामध्ये ठिकठिकाणी चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला असून सुमारे चार ते पाच ठिकाणी चोर्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सातार्यातील मंगळवार पेठ व तालुक्यातील कोंडवे, सैदापूर येथे चोर्या झाल्या असून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने, चांदी, रोकड असा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मंगळवार पेठेतील चोरीप्रकरणी सुवर्णा विश्वास देशपांडे (वय ४८, रा.मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० ते १७ मे रोजी या कालावधीत तक्रारदार देशपांडे या परगावी गेल्या होत्या. इतर कुटुंबिय घरीच होते. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये घरामध्ये लाईट फिटींगचे काम करण्यात आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरातून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या, १ लाख रुपये किंमतीचे मणिमंगळसूत्र, ९ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ६० हजाराचे मिनीगंठण, ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक, ४ हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण ३ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. तक्रारदार सुवर्णा देशपांडे गावावरुन परत आल्यानंतर त्यांना घरात ठेवलेले दागिने नसल्याचे लक्षात आले. याच दरम्यान, घरामध्ये फिटींगचे काम करण्यासाठी कामगार आल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चोरीबाबत प्राथमिक माहिती घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, सातारा शहरालगत उपनगरातील सैदापूर व कोंडवे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ही घटना मंगळवारी समोर आल्यानंतर त्या त्या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. चोरट्यांनी या परिसरातून ७ ते ८ तोळे सोन्याचा ऐवज लांबवलेला आहे. शंकर इंगळे यांच्या घरी चोरी झाली आहे. याशिवाय अनेकठिकाणी चोरीचे प्रयत्नही झाले आहेत. सातारा तालुका पोलिस माहिती घेवून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवत होते.
दरम्यान, सातारा शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले आहेेत. सध्या सुट्ट्या सुरु झाल्याने अनेकठिकाणी बंद घरे, फ्लॅट चोरट्यांकडून टार्गेट होत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |