सातारा : अवघ्या 6 वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून सातारा शहरातील एका उपनगरामध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सलम्या मंडे (रा.प्रतापसिंहनगर) याच्याविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पिडीत मुलगी दिवाळी सुट्टीनिमित्त नातेवाईकांकडे सातार्यात आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, याप्रकरणी 6 वर्षाच्या पिडीत मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अत्याचाराची ही घटना दि. 31 रोजी दुपारी एक ते अडीच या दरम्यान घडली आहे. अल्पवयीन मुलीला पाहिल्यानंतर संशयित सलम्या याने किराणा दुकानातून खाऊ देतो असे सांगितले. खाऊचे आमिष दाखवल्यानंतर संशयिताने त्या मुलीला दुसर्या खोलीत नेले व त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. या घटनेमुळे मुलगी घाबरली व तिने आरडाओरडा केल्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला.
घडलेल्या घटनेने मुलगी कमालीची घाबरुन गेली होती. यामुळे ती कोणाशी बोलत नव्हती. दोन ते तीन दिवस मुलगी घाबरलेली असल्याने व ती कोणाशी बोलत नसल्याने तिच्या आईने मुलीला बोलते केले. मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने मुलीला घेवून मंगळवारी शहर पोलिस ठाणे गाठले.
तक्रारदार महिला सध्या पुणे येथे राहत आहेत. दिवाळी सुट्टीनिमित्त त्या मुलीला घेवून सातार्यात आल्या आहेत. महिलेने व मुलीने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी संशयिताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित हा घटनेनंतर पसार झाला पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |