02:40am | Sep 22, 2019 |
कराड : मुख्याधिकारी श्री. डांगे म्हणाले, ‘शासनाने मंजूर केलेल्या डीपीआर निधीमधून बारा डबरे येथील जागेत एकूण एक हजार 800 स्न्वेअर मीटर जागेचे शेड मंजूर होते. यातील एक हजार 100 स्न्वेअर मीटर जागेत ओल्या कचर्यावरील प्रक्रियेसाठी शेडची निर्मिती केली आहे. त्यालगत 300 स्न्वेअर मीटरचे शेड उभारण्यात आले आहे. सुक्या कचर्यावरील प्रक्रियेसाठी एक हजार 200 स्न्वेअर मीटर शेडची निर्मिती होणार आहे. त्यात सुक्या कचर्यातील व्हॅल्युएबल प्रॉडक्टसाठीही छोटे शेड असणार आहे. कचरा डेपोसाठी नगरपालिकेकडे बारा डबरेतील 13 एकर जागा आहे. त्यातील दोन ते अडीच एकर जागेवर अतिक्रमण आहे. उर्वरित दहा एकर जागेत दोन वर्षापूर्वी कचर्याचे मोठे ढीग होते. तेथे कधीही आग लागत होेती. दुर्गंधी येत होती. मात्र, कचर्यावर शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया पालिकेने केले आहे. यातून मोकळया झालेल्या जागेवर शेडची उभारणी करण्यात येत आहे. जागेस संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. परिसर बंदिस्त आहे. ठराविक वेळेत तो नागरिकांना उपलब्ध असणार आहे. जागेतील दीड एकर जागेत ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार आहे. कचरा घंटागाडयांचे अपघात होऊ नयेत, यासाठी पालिका उपायायोजना करणार आहे. घंटागाडयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणार आहे.’
नगराध्यक्षा शिंदे यांनी आरोग्य कर्मचार्यांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून जोेमाने काम केले आहे. त्याच पध्दतीने कामाचा जोर कायम ठेवून पुढील वर्षीच्या स्पर्धेेतही आपण अव्वल येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राजेंद्रसिंह यादव यांनीही मुख्यधिकारी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्याने शहर पुन्हा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अव्वल क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विनायक पावसकर, वैभव हिंगमिरे, सुहास जगताप, मोहसीन आंबेकरी, अख्तर आंबेकरी, नगरसेविका विद्या पावसकर, रूपाली कुंभार, नोडल ऑफिसर रफीक भालदार, ए.आर.पवार. मारूती काटरे उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |