03:27am | Sep 01, 2019 |
सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील सेवक पतसंस्थेमध्ये कामगारांच्या असलेल्या योगदानामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीचा पाया मजबूत झालेला आहे. पतसंस्थेमुळे कामगारांची वेळीच आर्थिक विवंचना दुर करणे शक्य होत आहे असून पतसंस्था कामगारांसाठी संजीवनी ठरली असल्याचे करखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगून पतसंस्थेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
अजिंक्यतारा कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची व कामगार श्री गणेशोत्सव मंडळाची 2018-19 ची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे उपस्थित होते.
पतसंस्थेचे सचिव संभाजी पाटील सभेची यांनी नोटीस व अहवालाचे वाचन केले. 1 ते 10 विषयास उपस्थित कामगारांकडून एकमताने मंजूरी दिली. पतसंस्थेला ऑडिट ’ अ ’ वर्ग मिळालेला असून साधे कर्ज रू.4.00 लक्ष वरून रू.5.00 लक्ष करण्यास व सभासद कर्जाचे व्याजदर रू.12% वरून रू.11.50% करण्यास सभेने मंजूरी दिली.
कार्यकारी संचालक संजीव देसाई यांना नुकताच भारतीय शुगर ऑर्गानायझेशन संस्थेकडून बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर ऍवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल सर्व अधिकारी, कामगार-कर्मचारी, कामगार युनियनचे सर्व सदस्य यांच्यावतीने शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या 29 कर्मचा-यांचाही शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेमध्ये पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत संजीव देसाई यांनी माहिती अवगत करून दिली. पतसंस्थेला 2018-19 मध्ये रू.81 लाख 58 हजार इतका निव्वळ नङ्गा झालेला असून कामगारांचा एकूण 1 कोटी 7 लक्ष इतका रकमेच्या ठेवी जमा असल्याचे सांगून संस्थेने कामगारांना 12.25 % प्रमाणे डिव्हीडंड दिला असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचा कामगारांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने शिङ्गारस केलेल्या नङ्गा विभागणीस व पोटनियम दुरूस्तीस सभेने एकमताने मंजूरी दिली. श्री.गणेशोत्सव मंडळाने व सर्व कामगारांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून बचत होणा-या रकमेतून सांगली येथील पुरग्रस्त भागातील 2 शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके व दप्तर पुरविण्यास सभेने एकमताने मंजूरी दिली.
पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी थोरात (सिव्हिल इंजिनिअर) यांनी उपस्थित मान्यवरांचे व कामगारांचे स्वागत केले. विलास पाटील (शेती अधिकारी) यांनी प्रास्ताविक केले. कामगार युनियनचे अध्यक्ष धनवे यांनी आभार मानले. सभेला कारखान्याचे सर्व पदाधिकारी आणि कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |