नवी दिल्ली : सीमेवर धडाकेबाज पराक्रम करणारं सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यावेळी पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग्य सन्मान, आदर न दिल्याबद्दल बीएसएफ अधिकाऱ्यांनी एका जवानाचा सात दिवसांचा पगार कापलाय. या अजब शिक्षेबद्दल जवानांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय.
21 फेब्रुवारीला बीएसएफच्या 15व्या तुकडीच्या मुख्यालयात झीरो परेड सुरू होती. त्यावेळी जवान संजीव कुमार यांनी एक रिपोर्ट देताना अनवधानाने 'मोदींचा कार्यक्रम' असा उल्लेख केला होता. तो ऐकून कमांडिंग ऑफिसर अनूप लाल भगत चिडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाआधी 'माननीय' किंवा 'श्री' न वापरल्याबद्दल संजीव कुमारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर संजीव यांनी केलेल्या 'चुकी'बाबत सुनावणी झाली आणि बीएसएफ कायद्याच्या कलम 40 अन्वये त्यांना दोषी धरण्यात आलं. त्या अंतर्गतच त्यांचं सात दिवसांचं वेतन कापण्यात आलंय. ही शिक्षा जरा अतीच झाली, असं अनेक अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |

सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |