03:54pm | May 20, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे जीवनमान उंचावणारी, जिल्ह्याची तत्कालीन लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी सातार्यातील भू-विकास बँकेची इमारतही आज जमीनदोस्त झाली. गेली पाच दशके भू-विकास बँक चौक म्हणून ओळखली जाणारी चौकाची निशाणीही आज सातार्याच्या इतिहासातून आज पुसून टाकण्यात आली.
एकेकाळी राज्यभरात शेतकर्यांची तारणहार म्हणून ओळखल्या जाणार्या भू-विकास बँकांना सुमारे 15 वर्षांपूर्वीच घरघर लागली होती. 2000 साली सत्तेवर आलेल्या तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने आर्थिक संकटाचा सामना करणार्या भू-विकास बँकेला सापत्नभावाची वागणूक दिली होती. त्यामुळे या बँकेचे पुनर्जिवित होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली होती. राज्यातील अनेक सहकार महर्षींना स्वत:च्या आर्थिक संस्था शाबूत ठेवण्यासाठी राज्य भू-विकास बँक अवसायनात काढण्याची घाई झाली होती. गेल्या 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये राज्य सरकारने भू-विकास बँकांचे पुनर्जिवन करण्यासाठी अर्थसंकल्पात भू-विकास बँक संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यभरातील भू-विकास बँका अवसायनात निघाल्या. राज्यभरातील या बँकांमधील हजारो कर्मचारी देशोधडीला लागले. सातार्यातही गेल्या अनेक वर्षापासून या बँकेचे कामकाज ठप्प होते. सातारच्या लौकिकात भर घालणारी ही जुनी देखणी इमारत अखेरच्या घटका मोजत होती. अखेर लिलावात निघालेली ही इमारत सातारच्या काही बिल्डरांनी विकत घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरु आहे. जेसीबी आणि पोकलॅनच्या सहाय्याने ही इमारत उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. मात्र, ज्या बँकेने गेल्या पाच दशकामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे जीवनमान उंचावून स्थैर्य प्राप्त करुन दिले, त्याच बँकेची इमारत जमीनदोस्त होताना पाहून अनेकांच्या काळजात चर्रर्र झाले. मात्र पर्याय नाही, असे म्हणतही अनेकांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |