03:15am | Jan 26, 2020 |
फलटण : साखरवाडी, ता. फलटण येथे आयडीबीआय बँकेच्या शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा पडला असून सुमारे 2 किलो 640 ग्राम वजनाच्या सोन्याच्या 79 लाख 20 हजार किंमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून या धाडसी दरोड्यामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, साखरवाडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असणार्या आयडीबीआय बँकेच्या साखरवाडी शाखेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला. आयडीबीआय बँकेच्या मागील बाजूस असणार्या खिडकीचे गज वाकूवणु चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला व बँकेच्या स्टँग्ररुमची कुलपे स्टँग्ररुम मधील तिजोरी कशानेतरी कापुन यामधील 43 ग्राहकांचे सोनेतारण ठेवलेले सुमारे 2 किलो 640 ग्राम वजनाच्या सोन्याची अंदाजे 79 लाखाचे सोने चोरीस गेले आहे.
काल सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस पथक बँकेत चोरीला गेलेल्या मुद्देमालाची तपासणी करत होते. चोरीच्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांनी श्वानपथक बोलावले होते. बँकेत चोरी झाल्याची घटना कळताच साखरवाडी व आसपासच्या भागातील नागरिकांनी बँक परिसरात मोठी गर्दी केली होती. या धाडसी दरोड्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, साखरवाडी पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक नागटिळक यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी बँकेस सुट्टी असल्याने सकाळी 8 :45 वाजता बँकेचा शिपाई मागील बँकेची लाईट बंद करण्यास गेले असता चोरीची घटना निदर्शनास आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागटिळक करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |