नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा 'बेरजेचा' खेळ सुरूच असून वेटलिफ्टर संजिता चानू हिनं दुसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. संजिताने महिला वेटलिफ्टिंगच्या ५३ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळं भारताच्या खात्यात आता एकूण तीन पदके झाली आहेत.
पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलणाऱ्या संजितानं क्लीन अँड जर्क प्रकारात १०८ किलो वजन उचलून १९२ किलो वजन पेलण्याचा विश्वविक्रम केला आहे. पपुआ न्यू गिनीच्या लोआ टुआनं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिनं एकूण १८२ वजन उचललं. कॅनडाच्या रॅचेल बेझिनेट हिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तिनं १८१ किलो वजन उचललं. केवळ एक किलो वजन कमी उचलल्यामुळं ती तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.
संजितानं विश्वास सार्थ ठरवला!
संजिता चानू ही मूळची मणिपूरची आहे. चार वर्षांपूर्वी ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं. तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. सुवर्णपदकाची कमाई करून तिनं त्या पूर्ण केल्या. आतापर्यंत भारताच्या गुरुराजनं पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ५६ किलो वजनी गटात रौप्य तर, मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक मिळवलं आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |