कराड : कराड तालुक्यातील सुपने परिसरात गेले 15 दिवस बिबटयाचा वावर असुन काहींना प्रत्यक्ष बिबटयाचे दर्शन झाले आहे. मात्र शनिवार 1 रोजी सुपने ते जुने सुपने रस्त्यावर शेतालगत दोघांना बिबटयाचे नव्हे तर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने याबाबत खातरजमा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही दिवसापुर्वी जुने सुपने येथे शेतात बिबटयाचे दर्शन लोकांना झाले होते. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर तेथे पिंजराही लावण्यात आला. मात्र बिबटयाने हुलकावणी दिली. शनिवारी 1 जुन रोजी सायंकाळी सुपने येथील सत्यजित पाटील व त्याचा चुलत भाऊ दुचाकीवरून जुने सुपनेकडे निघाले होते. जुने सुपनेलगत त्यांना बिबटयासद़ृश्य प्राणी दिसला. दुचाकी थांबवुन पाहिले असता त्यांना तो वेगळा असल्याचे जाणवले. त्यांनी याची कल्पना गावातील शेतकरी शिवाजी पाटील यांना दिली. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून तो बिबटया नसुन पट्टेरी वाघचे फोटो दाखवले असता त्यांनी पट्टेरी वाघच पाहिल्याचे ठामपणे सांगितले. वनविभागासही कल्पना देण्यात आली वनविभागाने पिंजर्यांची जागाही बदलली आहे. गस्तही सुरू आहे. याबाबत वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पट्टेरी वाघाला आवश्यक नैसर्गिक अधिवास आपल्या भागात नाही. मात्र पट्टेरी असा उल्लेख येत असल्याने तो तरस असण्याची शक्यता आहे. आपल्या भागाता तरसाचा वावर आहे. तरीही वनविभागाने यांची खात्री करावी.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |