सातारा : "बंद करा, बंद करा मॉबलिंचींग बंद करा" आझादी आझादी, धर्मवादसे आझादी", "तबरेज तेरे खुनसे, इन्कलाब आएगा "राम हमारा, रहिम हमारा, नफरत का ए खेल तुम्हारा' अशा घोषणा देत सातारा येथे आज दुपारी शांतताप्रेमी व मानवतावादी नागरिकांच्यावतीने भर पावसात महामोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
देशभरात धार्मिक कट्टरवाद्यांकडुन मॉबलिंचींगच्या घटना वाढल्या आहेत. दलित, आदिवासी, व अल्पसंख्यांकाविषयी, सातत्याने विद्वेष आणि घृणेचे वातावरण निर्माण केले जात आहे. लोकशाही व कायदा-सुव्यवस्था व न्याय या सारयांवरचा विश्वास उडावा इतकी परिस्थिती गंभीर आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ सातारा शहरातील सर्व मानवतावादी व शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा महात्मा गांधी मैदानावरुन राजपथमार्गे पोवई नाक्यापर्यंत काढण्यात आला.
भरपावसात घोषणा देत मोर्चा शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आला. मोर्चाचा समारोप पोवई नाक्यावर करण्यात आला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चापुढे मौलाना जमिर, सातारा जिल्हा महिला संघटनेच्या ऍड. वर्षा देशपांडे, विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडके यांची भाषणे झाली. मोर्चाचे आयोजन जमियत उलेमा-ए-हिंद, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सातारा जिल्हा महिला संघटना, मुक्तीवादी संघटना, मुस्लिम जागृती अभियान, मुस्लिम ओ.बी.सी. संघटना, संबोधी प्रतिष्ठान, सिटू, सलोखा, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, अखिल भारतीय छावा संघटना, सत्यशोध, सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, भारत मुक्ती मोर्चा, समाजवादी प्रबोधिनी, श्रमिक मुक्ती दल, आदी संघटनांनी केले होते. मोर्चा नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पंतप्रधान यांना द्यावयाचे निवेदन दिले.
मोर्चामध्ये शाही मस्जिद चे इमाम हाफिज खलिल अहमद काघजी, मुफ्तीसाब अब्दुल हमीद, मौलाना जमीर, हाजी जलाल्लुद्दीन, आघाडीचे उद्योजक बाबाशेठ तांबोळी, ऍड शैला जाधव, मिनाज सय्यद, अहंमद कागदी, नगरसेवक शकिल बागवान, हाजी सादिकभाई शेख, सादिक खान, अमजदभाई शेख, भारत मुक्ती मोर्चाचे मौलाना कमरुद्दीन, मुजफ्फर सय्यद, तौसिफ शेख, आरिफ शेख, मिलिंद पवार, मुसरत शेख, मोहसीन कोरबू, अहमद कागदी, रफिक शेख, सोहेल सय्यद, जुनैद शेख, गुफरान शेख, कॉ वसंत नलावडे, दिनकर झिम्बरे, रखमा हेमा श्रीकांत यांच्या सह अनेकजण सहभागी झाले होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |