04:20pm | Dec 07, 2019 |
सातारा : वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर) व डॉ. अभय दातार (नांदेड) यांची निवड करण्यात आली व जीवनगौरव प्रथम पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ.अशोक चौसाळकर यांची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने या वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. या पहिल्या पुरस्कारासाठी वैचारिक क्षेत्रात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल. भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
भोळे कुटुंबीय व दाते संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्या डॉ.भा.ल.भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी तरुण अभ्यासक नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अभय दातार यांची निवड करण्यात आली आहे.
वरील पुरस्काराचे स्वरूप डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.
हे पुरस्कार डॉ. भा. ल. भोळे यांच्या स्मृतिदिनी येत्या 24 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुणे येथे म. स. प. चे माधवराव पटवर्धन सभागृहात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे (वर्धा) डॉ. चैत्रा रेडकर (मुंबई) हिरण्यमय भोळे (पुणे) व किशोर बेडकिहाळ (सातारा) आदी मान्यवरांनी काम केले अशी माहिती दाते संस्थेचे कार्यवाह संजय इंगळे तिगावकर, संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली, माधुरी सुमंत, विजयाताई भोळे व दातेसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक साहित्यक व सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |