नवी दिल्ली : चिनी सोशल मीडिया अँप टिकटॉक (Tiktok) आणि हॅल्लो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. कारण, या अँपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अँपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे. जर या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर या अँप्सच्या वापरावर भारतात बंदी येऊ शकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे Tiktok आणि Helo या चीनी मोबाईल अँपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही अँप्स देशविरोधी कामांचा अड्डा बनल्याचा आरोप या संघटनेने केला होता. या तक्रारीची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून या अँप्सच्या अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. यावर Tiktok चे म्हणणे आहे की, पुढील तीन वर्षात स्थानिक पातळीवर जबाबदारीसाठी तंत्रज्ञानासंबंधी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कंपनी १०० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
Helo अँपबाबत ‘स्वदेशी जागरण मंच’ने निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, Helo अँपद्वारे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ११ हजारांहून अधिक राजकीय जाहिरातींसाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या जाहिरातींमध्ये भारतातील वरिष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्याचबरोबर, हे दोन्ही अँप चीनी कंपनीचे असल्याने यामध्ये चीन सरकार हस्तक्षेपाद्वारे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. याचा उपयोग भारतात सामाजीक अराजकता माजवण्यासाठी होऊ शकतो, असेही ‘स्वदेशी जागरण मंच’ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी मद्रास हायकोर्टाने Tiktok अँपच्या डाऊनलोडिंगवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. तसेच या अँपमधील व्हिडिओ फेसबूकवर शेअर करण्यावरही बंदी घालण्यास सांगितले होते. त्याचबरोबर लहान मुलांना या अँप्सपासून दूर ठेवण्यासाठी काही कायदा करता येईल का? याचीही विचारणा केली होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |