महाबळेश्वर : मुंबई येथील मुलुंड येथे सलग 60 तास 98 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मोठया उत्साहात पार पडल्यानंतर आता 99 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन महाबळेश्वर येथे भरविण्याची तयारी येथील नाटय परिषदेच्या शाखेने केली असुन तसा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचेकडे दिला आहे. यावेळी नाटयपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे उपस्थित होते. अशी माहीती येथील नाटय परिषदेचेच्या शाखेचे अध्यक्ष डी.एम बावळेकर यांनी दिली.
नाटय परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवीन पदाधिकारी यांनी परिषदेचा कार्यभार स्विकारला होता या नुतन पदाधिकारी यांचेकडे 98 वे नाटय संमेलन महाबळेश्वर येथे भरविण्यात यावे, यासाठी प्रस्ताव दिला होता. नियामक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली, व नाटय संमेलनासाठी जवळ जवळ महाबळेश्वरची निवड निश्चित झाली होती. परंतु नाटय परिषदेच्या तारखा महाबळेश्वर शाखेला गैरसोयीच्या वाटल्याने महाबळेश्वर शाखेने जूनमध्ये संमेलन भरविण्याबाबत असमर्थता व्यक्त केली, त्यानंतर परिषदेने 98 वे संमेलन हे मुंबईत भरविण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय नाटय परिषदेचे 98 वे नाटय संमेलन नुकतेच मुलुंड, मुंबई येथे उत्साहपुर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनासाठी महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी.एम बावळेकर कार्यवाह संजय दस्तुरे कोषाध्यक्ष विलास काळे व कार्यकारीणी सदस्य अभिजीत खुरासणे हे आवर्जुन उपस्थित होते. संमेलनाच्या दुसरया दिवशी परिषदेचे पदाधिकारी व शाखेचे पदाधिकारी यांच्याच चर्चा झाली या चर्चेसाठी महाबळेश्वर शाखेचे पदाधिकारीही उपस्थित होते. याचवेळी नाटय संमेलन महाबळेश्वर येथे भरविण्याची मागणी करणारा प्रस्ताव प्रसाद कांबळी यांना सादर करण्यात आला. यावेळी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे नियामक मंडळाचे सांगली येथील प्रतिनिधी श्रीनिवास जरंडीकर , मुकुंद पटवर्धन व संदीप पाटील तसेच कोल्हापुरचे गिरीश महाजन आदी प्रमुख उपस्थित होते.
नाटयसंमेलनाच्या स्थळाबाबत निर्णय घेण्यापुर्वी नाटय परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे महाबळेश्वर शाखेच्या पदाधिकारी यांचे बरोबर बैठक होणार आहे. त्यानंतर नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व इतर पदाधिकारी यांचे बरोबर महाबळेश्वर दौऱ्यावर येणार असुन, ते येथे संमेलनस्थळ निवास व्यवस्था आदीची पाहणी करणार असल्याची माहीतीही महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी.एम बावळेकर यांनी दिली. या वेळी नाटयपरिषदेचे उपाध्यक्ष संतोष शिंदे, कार्यवाह संजय दस्तुरे कोषाध्यक्ष विलास काळे, अभिजीत खुरासणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |