02:45pm | Dec 06, 2018 |
सातारा : फ्लॅट देण्याच्या आमीषाने माजी सैनिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तेजस राजुमार जाधव (रा. सोमवार पेठ, सातारा, मुळ रा. करंडी, ता.सातारा) या बिल्डरला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 8 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणात आणखी पाच तक्रारदार आले असून आतापर्यंत सुमारे 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
निवृत्त सैनिक चंद्रकांत तुकाराम पवार (रा. निगडी तर्फ सातारा) यांनी मंगळवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चंद्रकांत पवार यांना सातारा येथे फ्लॅट खरेदी करायचा असल्याने ते तेजस जाधव याला भेटले. त्याने पंचपाळी हौदाजवळ अपार्टमेंटचे काम सुरु करणार असल्याची माहिती देवून 12 लाख रुपये घेतले. पैसे देवूनही इमारतीचे काम सुरु होत नसल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांनी फसवणूकीची तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच शाहूपुरी पोलिसांनी संशयित बिल्डर तेजस जाधव याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 8 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, बिल्डर तेजस जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त सातार्यात पसरल्यानंतर बुधवारी आणखी पाच तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून फसवणूक झाल्याची माहिती दिली. रविंद्र कुलकर्णी (रा.शनिवार पेठ) यांची 13 लाख 50 हजार रुपये, पूजा आवळे (रा.शनिवार पेठ) यांची 10 लाख रुपयांची, उमेश खजुरे (रा.फॉरेस्ट कॉलनी) यांची 10 लाख 40 हजारर रुपयांची, समाधान घाडगे (रा. फुटका तलाव परिसर) यांची 2 लाख रुपयांची तर सुधीर निकम (रा.फुटका तलाव परिसर) यांची 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहेे. बुधवारी दिवसभर तक्रारदारांची रांग लागल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर गर्दी होती. रात्री उशीरापर्यंत या तक्रारदारांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नसीमखान फरास हे करत आहेत.
यामध्ये आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आक्षहे. सातारा शहरासह परिसरात आणखी कोणाची फ्लॅट देतो, असे सांगून फसवणूक झाली असेल तर त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |