सातारा : सातारा येथील सदर बझार उर्दू शाळा क्र १२ व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर बझार येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती अभियान व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमास सदर बझार परिसरातून अतिशय चांगला प्रतिसाद होता. लहान मुले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते. मुलांनी दिलेल्या जहाँ हरियाली-वहां खुशहाली, वने वाचवा - देश वाचवा अशा घोषणांनी सदर बझार, लक्ष्मी टेकडी परिसर, रहमत वस्ती हा सर्व परिसर दणाणून गेला. या रॅलीमधून उर्दू शाळेच्या मुलांनी छोट्या छोट्या संवादातून , गाणी आणि नृत्यातून पर्यावरण जागृतीसाठी छान सादरीकरण केले.
या रॅलीमध्ये प्रशासन अधिकारीभांगे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सौ. राठोड मॅडम आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. त्यांनी मुलांशी पर्यावरणाच्या समस्येविषयी अतिशय मार्मिकपणे संवाद साधला. तसेच या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा शेख म्हणाल्या की दिवसोंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तापमान वाढ, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाऊस न पडणे असे फार गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. मुहम्मद पैगंबर साहेबांनी साडेचौदाशे वर्षांपूर्वी वृक्षारोपणाचे महत्व सांगून वृक्षारोपणाचा संदेश दिला होता. उद्या जगबुडी जरी आली तरी आज झाडे लावली पाहिजेत, अशी ताकीद दिली होती. पण आपण ते विसरलो आणि त्याचे परिणाम आज भोगत आहोत. म्हणूनच हा जनजागृतीचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमात मुलांमध्ये प्रचंड उत्साह होता. आज आपण लावत असलेली झाडे जगवण्याचा निर्धार मुलांनी केला व पुढच्या वर्षी याच दिवशी या झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्याचे पाहुण्यांना आत्ताच निमंत्रण दिले. सदर बझार परिसरातील नागरिकांमध्ये या रॅलीमुळे खूप उत्साहाचे वातावरण तयार झाले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर अमजद मौलवी, लतीफ चौधरी, इम्रान कुरेशी, अमजदभाई, वनविभागाची टीम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |