07:48pm | Jun 07, 2019 |
सातारा : सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा घालून फोर्ड आयकॉन कंपनीच्या एक चारचाकी वाहनासह एकूण 2 लाख 4 हजार 178 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमध्ये 4 जणांना अटक करण्यात आली असून रज्जाक हिराबाई सय्यद रा. मलवडी ता. फलटण हा फरार असून एकूण 5 जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक स्नेहलता श्रीकर राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीमध्ये आसीफ रज्जाक सय्यद रा. मलवडी, ता. फलटण याच्या ताब्यातून बनावट दारु निर्मिती करीता लागणारे स्पिरीट, रिकाम्या देशी दारु सखू संत्राच्या व विदेशी दारू मॅकडॉल नं. 1 व्हीस्कीच्या बाटल्या, बुचे, इसेन्स, बुचे सील करण्यासाठी वापरण्यात येणारे एक हातमशीन, बनावट 180 मि.ली. व 90 मि.ली. क्षमेच्या देशी दारु सखू संत्रा व बनावट विदेशी दारु मॅकडॉल नं. 1 व्हीस्की दारुचा साठा व फोर्ड आयकॉन कंपीनीची एक चारचाकी वाहन. मौजे वाखरी ता. फलटण येथून संशयीत आरोपी बाबा मारुती जाधव याच्या ताब्यातून बनावट देशी दारु सखू संत्राचा रुपये 3 हजार 640 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास ईश्वर काकडे रा. बिबी, ता. फलटण्ण याच्या ताब्यातून बनावट देशी दारू सखू संत्राचा रुपये 1 हजार 352 किंमतीचा तर राहुल श्रीकांत सरगर रा.पवार गल्ली महतपुरा पेठ मलटण ता. फलटण याच्या ताब्यातून विदेशी दारुचा रुपये 4 हजार 170 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिलेवंत, एस. व्ही. खराडे, बी.व्ही. ढवळे. नितीन शिंदे, महेश गायकवाड, सचिन खाडे, महेश मोहिते, राजेंद्र आवघडे, अजित रसाळ, अरुण जाधव, सागर साबळे यांनी भाग घेतला. पुढील तपास प्र. निरीक्षक संजय शिलेवंत हे करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |