07:02pm | May 12, 2018 |
शिरवळ : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
दरम्यान, कोंडी टाळण्यासाठी पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. शनिवार, रविवार सलग सुट्यांमुळे नागरिक फिरण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहे.
प्रामुख्याने थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली. दुपारनंतर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, शनिवारी दुपारी खंबाटकी घाटातील वळणावर विविध ठिकाणी सहा मालट्रक इंजिन गरम झाल्याने बंद पडले. परिणामी महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा वाहतूक कोंडीने हिरमोड झाला. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावर तोडगा काढण्यासाठी पुण्याहून सातारा बाजूकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. खंडाळा व भुर्इंज महामार्ग पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |