सातारा : जुन्या पिढीतील अभ्यासू पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक दलितमित्र गो. मा. वाघमारे गुरुजी यांचे रात्री एक वाजता संगमनगर सातारा येथील त्यांच्या 'पुरस्कार' या निवासस्थानी वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या तीरावर आज दूपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गो. मा. वाघमारे गुरुजी यांचे मुळ गांव वरुड असले तरी त्यांचे वास्तव्य खटाव येथे होते. अण्णा या नावानेही लोक त्यांना ओळखायचे. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास त्यांना लाभाला. ज्या काळात शिक्षण घेणं सहज शक्य नव्हते, अशा काळात वाघमारे अण्णांनी स्वतःचे शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण केले होते. जणू बाबासाहेब आंबेडकरांचा 'शिका' हा महामंत्र त्यांनी स्वतःच्या आयुष्यात मनापासून उतरवला होता. वाघमारे अण्णाची कुशाग्र बुध्दीमत्ता आणि चाणाक्ष वृत्ती ओळखून कर्मवीर भाऊरांंवानी वाघमारे यांना शैक्षणिक क्षेत्रात येण्याची विनंती केली. त्यानुसार वाघमारे अण्णानी शिक्षक पेशा स्वीकारला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उत्तम कार्य केले. तेव्हापासून अण्णांची ओळख गुरुजी अशी झाली. शिक्षक म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी खटाव परिसरातून पत्रकारीतेला सुरुवात केली. उत्तम पत्रकारीता करत त्यांनी त्याही क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकण्याची व पाहण्याची संधी त्यांना लाभली. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावर बा़साहेबांच्या विचारांचा प्रभाव राहिला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जशी अनेकांना दिशा दिली, तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठीही त्यांनी योग्य दिशादिग्दर्शन केले. गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ते धडपडत राहिले. अनेक मुलांना पत्रकारीतेच्या क्षेत्राकडेही त्यांनी वळवले. स्वतःची पाचही मुले उच्च विद्याविभूषित केली.
वाघमारे अण्णा यांच्या नावावर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वतीने दलितमित्र पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांची नोंद आहे. झूंज आणि झेप हे त्यांचे आत्मकथन प्रचंड गाजले. वर्तमानपत्रे, आकाशवाणी आदी माध्यमातून त्यांच्या मुलाखती प्रसारीत झाल्या. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा दरारा राहिला.
मागील आठवड्यात प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. डिचार्ज मिळाल्यानंतर अनेक मान्यवर वाघमारे अण्णांना घरी येऊन भेटून जात होती. दोन दिवसांपासून तब्येत ढासळू लागली आणि रात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी कलावती वाघमारे, डॉ. मंगल वाघमारे - गायकवाड, प्रोफेसेर सुनील वाघमारे, निर्मला वाघमारे- म्हस्के, पोलिस इन्स्पेक्टर अनिल वाघमारे हे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. निधनाचे वृत्त सातारा परिसरासह खटाव पंचक्रोशीत पसरताच असंख्य लोकांनी साताराच्या 'पुरस्कार' या अण्णाच्या राहत्या घरी गर्दी केली.
दरम्यान दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, डॉ, नरेंद्र गायकवाड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आशोक गायवाड, निवृत्त अधिक्षक अभियंता रमेश इंजे, डॉ. प्रल्हाद इंजे, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे, अरुण जावळे, ब्ल्यू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, क्रांति थिएटरचे अमर गायकवाड, दिलीप भोसले, श्यामराव माने, रणजित काळेबाग, राजेंद्र जावळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली. शनिवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता संगमनगर, सातारा येथील पुरस्कार या निवासस्थानी जलदान विधी कार्यक्रम होणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |