11:35pm | May 18, 2018 |
कुडाळ : जावली तालुक्यात अवैद्य दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांचा धडाका सुरूच असून, कुडाळ ता. जावली येथील कुख्यात अवैद्य दारू विक्रेता दीपक शामराव वारागडे व संतोष राजाराम जाधव या दोघांना अवैद्य दारूची वाहतूक करताना कुडाळ येथे शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दारूचे देशी-विदेशी असे १७ बॉक्स व दारू वाहतूक करणारी पीक-अप गाडी असा एकूण 2 लाख ७९ हजार ९६८ रुपचा दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मेढा पोलिसांनी अवैद्य दारू विक्रेत्यांवर फास आवळला आहे. आज गुप्त सुचनेनुसार मेढा पोलिसांना अवैद्य दारू वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार मेढा पोलिसांनी सापळा रचून अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना गाडीसह ताब्यात घेत, गाडीची झडती घेतली असता पोलिसांना देशी-विदेशी दारूचे १७ बॉक्स आढळून आले.
हे दारूचे बॉक्स हिंदुराव कृष्णराव भोसले यांच्या मालकीच्या सातारा येथील शाहू चौकातील विशाल वाईन या परवानाधारक दारू दुकानांतून हा माल खरेदी करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यामुळे, विशाल वाईन्स या दारू दुकानावर व मालक हिंदुराव कृष्णराव भोसले याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांनी सांगितले आहे.
कुडाळ येथील अबोली ढाब्याचा मालक व जावली तालुक्यातील कुख्यात अवैद्य दारू विक्रेता दीपक शामराव वारागडे याच्यावर यापूर्वीसुद्धा अवैद्य दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल असतानाही दीपक वारागडे बिनदिक्कतपणे दारू विक्री करतचं असल्याचे पुन्हा उघडकीस आल्यामुळे त्याचावर एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी संशयित आरोपींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने करीत आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |