कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या 5 नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज एकत्रितपणे नगरपरिषद कार्यालयात थाटात प्रवेश केला. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सर्व नगरसेवकांचे स्वागत करून, भविष्यातील कामकाजाबाबत चर्चा केली.
मलकापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली लढत दिली. यामध्ये मलकापूरच्या जनतेने प्रभाग क्र. 2 मधून भाजपाच्या नुरजहॉं राजू मुल्ला, दिनेश रैनाक, प्रभाग क्र. 5 मधून भास्कर सोळवंडे आणि प्रभाग क्र. 8 मधून निर्मला आण्णासो काशीद व अजित थोरात या पाच उमेदवारांना भरघोस मते देऊन निवडून आणले. भाजपाच्या या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज अहिल्यानगर चौकापासून शिवाजी चौक मार्गे मिरवणुकीने नगरपरिषद कार्यालयात प्रवेश केला. यावेळी मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सर्वांचे स्वागत करून, विरोधी पक्षासाठी नगरपरिषदेत स्वतंत्र कक्ष करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना अजित थोरात म्हणाले, की सत्ताधार्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावून, त्यांना मलकापूरातील जनतेच्या प्रगतीसाठी काम करण्यास आम्ही भाग पाडणार आहोत. प्रशासनाने सर्वांना समान वागणूक द्यावी असे सांगतानाच, नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी भाजपाचे आम्ही पाचही नगरसेवक सदैव तत्पर असू, अशी ग्वाही भास्कर सोळवंडे यांनी दिली. नूरजहॉं मुल्ला यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर दिनेश रैनाक यांनी युवकांसाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. तसेच निर्मला काशीद यांनी झोपडपट्टी परिसराच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, राजू मुल्ला, राजू पवार, सुधाकर शिंदे, अरूण यादव, शंकर बेले, बापू जंत्रे, रमेश मंद्रे, उमेश सांडगे, गणेश कुंभार, सोमनाथ नलवडे, संतोष हिंगसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |