सातारा : येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत पिटीशन रायटर, दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेत्यांनी खुलेआम कोणाचीही परवानगी न घेता शासकीय जागेत दुकाने थाटली आहेत. या गंभीर प्रकाराची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक लिपारे जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, तक्रारअर्ज देवून पंधरा दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरु असून अर्थपूर्ण तडजोडी (?) झाल्यामुळेच जिल्हा प्रशासन ‘ते’ अतिक्रमण काढण्यास अनुत्सुक असल्याची चर्चा आहे.
सातारा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालये सातार्यात आहेत. सातार्यात प्रशासकीय इमारत असली तरी ती जागाही प्रशासकीय कार्यालयांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालये सातारच्या गल्लीबोळात आहेत. ते शोधता-शोधता अनेकांची दमछाक होते. मात्र असे असताना सातार्यातील प्रांत व तहसिलदार कार्यालयाच्या आवारात शासकीय जागेत गेल्या अनेक वर्षांपासून पिटीशन रायटर, दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेत्यांनी खुलेआम कोणाचीही परवानगी न घेता आपली बेकायदेशीरपणे दुकाने थाटली आहेत आणि वरुन त्यांची मुजोरी वाढल्यामुळे तहसिलदार आणि प्रांत कार्यालयात कामानिमित्त येणार्या लोकांना त्यांचा नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. दि. 24 जून रोजी सातारा येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू 15 दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. उलट, पिटीशन रायटर, दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेत्यांनी राजकीय पुढार्यांना याप्रकरणात पुढे घालून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक बातमी 'सातारा टुडे'च्या हाती लागली आहे.
स्थानिक पुढार्यांच्या दट्ट्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात शेपूट घातल्याची चर्चा आहे. सातारा शहरात अतिक्रमणे काढीत असताना प्रशासन गोरगरीबांचा विचार करीत नाही. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीररित्या पिटीशन रायटर, दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेत्यांनी कोणाचीही परवानगी न घेता तसेच शासनाला कोणत्याही प्रकारचे भाडे न देता गोरगरीब जनतेला लुबाडण्याचे काम केले आहे. अशांना सातारा जिल्हा प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रांत व तहसिलदार कार्यालयात कामानिमित्त येणार्या लोकांनी केलेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहुल पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच येत्या काही दिवसांत जिल्हा प्रशासनाने हे अतिक्रमण न काढल्यास खळ्ळ्खट्याक करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिलेला आहे. तसेच या प्रकरणातील तक्रारदार अशोक लिपारे यांनीही जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |