04:54pm | Dec 20, 2018 |
सातारा : फलटण व कराड येथील नामचीन गुन्हेगार कोल्हापूरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी त्यांना रंगेहात अटक करुन त्यांच्याकडून अलिशान गाड्यांसह दोन अग्निशस्त्रे जप्त केली होती. या कारवाईमुळे फलटणसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी या टोळीवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली.
दि. 18 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणार्या फलटण येथील नामचीन गुन्हेगार चेतन कांबळेच्या टोळीला कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोनि मानसिंह खोचे यांनी ताब्यात घेतले होते. यावेळी या टोळीकडून 9 एमएम व पॉईंट 32 बोअरच्या दोन पिस्तुलांसह 7 जिवंत राऊंड तसेच दोन अलिशान कार जप्त केल्या होत्या. यामध्ये चेतन शिवाजी कांबळे (वय 32) रा. कोळकी, ता. फलटण व चेतनचा वकील असणारा भाऊ संदीप शिवाजी कांबळे (वय 33), श्रीकांत उर्फ गोट्या चंद्रकांत कदम (वय 30) रा. कॉलेज रोड शुक्रवार पेठ फलटण, कराड येथील कुख्यात गुंड सल्या चेप्यावर फायरिंग केलेला कराड येथील गुंड किरण गुलाब गावित (वय 29), शिवराज सुरेश इंगवले (वय 25) रा. लाहोटी नगर, मलकापूर कराड, नितीन गणपत शिर्के (वय 27) रा. नांदलापूर ता. कराड यांना दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली होती. कोल्हापूरमध्ये या सर्व प्रकारामुळे खळबळ उडाली होती. सुरुवातीला या टोळीने नाव व पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली होती. तसेच घटनास्थळावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या टोळीतील तीन संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यांचाही युद्धपातळीवर शोध घेत असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी सांगितली आहे. दरम्यान चेतन कांबळे याच्या अनेक भानगडी यानिमित्ताने बाहेर येणार आहेत. यातील संशयित आरोपी किरण गुलाब गावित याचा कराड येथील कुख्यात गुंड सल्या चेप्यावरील फायरिंगमध्ये सहभाग होता. त्यामुळे गावित व चेतन कांबळे ही केमिस्ट्री अवैध धंद्यांमध्ये चांगलीच जुळून आली होती. त्यामुळे त्यांनी फलटण, कराड, सातारा, पुणे, मुंबई याठिकाणी अनेक भानगडी केलेल्या आहेत. या टोळक्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची कुंडली काढण्याचे काम सुरु झाले आहे. गुन्ह्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करता येईल काय? याबाबत कोल्हापूर पोलीस प्रयत्न करीत आहेत.
चेतन कांबळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. नोकरी लावतो, माथाडीमध्ये लावतो अशी अमिषे दाखवून चेतन कांबळेने अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळलेले आहेत. संबंधितांनी काम न झाल्याने पैशाचा तगादा लावल्यानंतर चेतन कांबळेने आपला ‘गॉडफादर’ असलेल्या फलटण येथील दाढीवाल्या पुढार्याचा ढोस पाजून अनेकांना गप्पगार केले आहे. याचा वाटा त्या दाढीवाल्या पुढार्यालाही दिल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. फलटणमधील ‘त्या’ दाढीवाल्या पुढार्याचा आणि चेतन कांबळेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ‘दोस्ताना’ आहे. या ‘आशिकी’पोटीच त्या दाढीवाल्या पुढार्याने आपली आवडती कार चेतनला आंदण दिल्याची चर्चा आहे. चेतन कांबळेचा फुगा काही वर्षांपूर्वीच फुटला असता. परंतू फलटणमधील त्या दाढीवाल्या पुढार्याने चेतनला अभयला दिल्यामुळे चेतनच्या या भानगडी अद्याप गुलदस्त्यात होत्या. मात्र बारामतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असणारे आणि आडग्या बारामती शहराला ‘सरळ’ केलेल्या पोनि मानसिंह खोचे या दबंग अधिकार्याने या टोळीच्या मुसक्या आवळल्याने फलटणमधील त्या दाढीवाल्या पुढार्याचीही झाडाझडती होणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने अनेक भानगडी बाहेर येणार आहेत. याप्रकरणी चेतन कांबळे टोळीवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |