सातारा : पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र कल्याण निधी या संस्थेतर्फे दिला जाणारा मराठी वृत्तपत्रातील जनक धाडसी “दर्पण”कार पुरस्कार एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल तपासे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार 17 मे रोजी पोंभुर्ले ता देवगड जि सिंधुदुर्ग येथे करण्यात येणार आहे. 27 व्या दर्पण पुरस्काराची घोषणा रविंद्र बेडकीहाळ यांनी केली
राहुल तपासे यांनी 25 वर्षापुर्वी आपल्या पत्रकारीतेला सुरवात केली. दैनिक तरुण भारत, दै पुढारी अशा वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली असून एबीपी माझाच्या स्थापनेपासून अखंड 13 वर्ष सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत. सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये डिग्री घेतलेल्या राहुल तपासे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सुरवात केली. दै पुढारी मध्ये अखंड तीन वर्ष “ धतिंग “ सदर चालवून अनेक विषयांचा पोल-खोल केला. शिवाय लाल माती या विषयातून लाल माती तस्करीचे स्टिंग ऑपरेशन केले, एबीपी माझाच्या माध्यमातून शासकिय कामात टक्केवारी कशी चालते याचे स्टिंग ऑपरेशन करुन तीन अधिकारी आणि दोन कर्मचारी निलंबीत करत पाठपुरावा, कोयना अभयारण्यातील बेसुमार वृक्षतोडीचे स्टिंग, कोयणेच्या दुर्गम भागातील शिक्षणापासून ते अनेक स्पेशल विषय, देशातील सर्वाधिक पाऊस कोसळणारे कांदाटी खो-यातील गाव ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रासमोर आणले, माण खटावच्या दुष्काळी भागातील लोकांच्या व्यथा, 2010 -11 मध्ये राज्यावर दुष्काळाच सावट असताना चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शुटिंगसाठी धोम धरणातील पाण्याची चित्रपटाच्या सेटवर पाण्याची नासाडीचे स्टिंग ऑपरेशन, भांबवली धबधबा जगासमोर उघड केला, त्याच बरोबर 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या काळात राज्यातील अनेक खळबळजनक बातम्यांचे सर्वात जलद वार्तांकन अशा अनेक बातम्यातून त्यांनी आपल्या पत्रकारीतेत ठसा उमटवला, त्याच बरोबर राहुल तपासे हे स्वता एक ट्रेकर्स असून त्यांनी अपघातग्रस्तांना दरीतून बाहेर काढण्याचे काम केले. यात अंबेनळी घाटातील दरीत बेपत्ता कार शोधून त्यातील चार जिवंत आणि दोन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठीचे मोठे योगदान दिलेच शिवाय त्यानी त्याच दरीतून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट केला होता. राहुल तपासे याच पत्रकारीतेतील योगदानाबद्दल त्यांना धाडसी “दर्पण”कार पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |