10:17pm | Sep 26, 2018 |
सातारा : देशभरात नावाजलेल्या सातारा येथील सैनिक स्कूलमधील सुमारे ६० ते ७० विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू ची लागण झाली असून परिसरात संसर्गजन्य वाढला आहे. असा खोटा अपप्रचार सोशल मीडियावर करणाऱ्यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीतांची नावे पोलीस तपासातून उघड झाल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रणजीत नलावडे यांनी सांगितले.
सातारा शहरात सध्या स्वाईन फ्लू आजाराच्या संसर्गामुळे अनेक जण आजारी पडले आहेत. या आजाराची दहशत वाढल्याने प्रतिबंधक उपायाबाबत थेट जिल्हाधिकारी यांनी जनतेशी आकाशवाणी आणि अन्य कार्यक्रमातून संवाद साधला. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून ही खबरदारीचे सर्व उपाय योजना राबविल्या जात आहेत.सैनिक स्कूल प्रशासनाने खबरदारी म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगी घेऊन आठ दिवस शाळेला सुट्टी देऊन सर्वच विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे.
मात्र काही खोडसाळांनी सैनिक स्कूल मध्ये ६० ते ७० विद्यार्थींना स्वाईन फ्लूची लागण झाली असून परिसरात संसर्गजन्य होण्याची भिती सोशल मीडियावर मेसेज करून घातली आहे. गेली दोन दिवस अशा मेसेजमध्ये काही बदल करून पुन्हा 'व्हायरल' होऊ लागले आहेत. याबाबत स्कूलकडे अनेकांनी विचारणा केली. संबंधित मेसेज खोटा असून तो करणारा आणि सोशल मीडियावर टाकून 'व्हायरल' करणाऱ्या सर्वांच्या विरोधात स्कूल प्रशासनाने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
संबंधित आरोपी आता सायबर सेल कडून शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे स्कूल बाबतीत काही माहिती समजली तर संपर्क करा, चुकीची माहिती देऊ नका, असे आवाहन कर्नल रणजित नलावडे यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |