शिरवळ : शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व निर्माण करीत भाजप-शिवसेना-रिपाइंला धक्कातंत्र देत शिरवळ विकास आघाडीच्या सुनील देशमुख यांनी बारा मते मिळवत विजय संपादन केला आहे. भाजप-शिवसेना-रिपाइंच्या शिरवळ परिवर्तन विकास महाआघाडीच्या कविता माने यांना सहा मते मिळाली. विशेष म्हणजे शिरवळमध्ये राजकीय भूकंप होत उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना-रिपाइंचे राष्ट्रवादीने गनिमी काव्याने एक मत फोडल्याने नेमके मत कोणत्या सदस्याचे फुटले यावर शिरवळमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे.
खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी उपसरपंच दिलीप गुंजवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लक्ष्मी पानसरे या होत्या तर ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले .
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, प्रकाश परखंदे, सचिन राऊत, ममता पिसाळ, दत्तात्रय रांगोळे, संगीता निगडे, राधिका बेलापूरकर, रिजवाना काझी, रुपाली गिरे, मंगल क्षिरसागर, महेश जाधव, ज्योती चव्हाण, संतोष खुडे, आशा कारळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उपसरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या शिरवळ विकास आघाडीकडून ग्रामपंचायत सदस्य सुनील देशमुख यांचा एकमेव तर भाजप-शिवसेना-रिपाइंच्या शिरवळ विकास परिवर्तन महाआघाडीकडून महेश जाधव, कविता माने यांनी उमेदवारी अर्ज सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याकडे दाखल केले होते. त्यानुसार अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व अर्ज वैध ठरले.यावेळी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या वेळेत ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी माघार घेतल्याने सुनील देशमुख व कविता माने यांच्यामध्ये थेट लढत होत गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक पार पडली.दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर सुनील देशमुख यांना उपसरपंचपदासाठी बारा मते पडली तर विरोधी कविता माने यांना सहा मते पडली . विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीने धक्कातंत्र देत गनिमी काव्याने भाजप-शिवसेना-रिपाइंच्या शिरवळ परिवर्तन विकास महाआघाडीचे एक मत फोडत सुनील देशमुख यांना अकरा सदस्यांव्यतिरिक्त बारावे मत पडल्याने राजकीय भूकंप होत एक मत नेमके कोणाचे फुटले यावर शिरवळमध्ये विविध तर्कवितर्क लढवत चर्चासत्र सुरु झाले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी सुनील देशमुख यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा करताच शिरवळ ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या हस्ते सुनील देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान,सुनील देशमुख यांची शिरवळ उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे ,जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भाजप-शिवसेना-रिपाइंच्या महाआघाडीला धक्कातंत्र.. एक मत नेमके फुटले कोणाचे ? चर्चेला वेग
शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र तांबे,उदय कबुले यांनी तर भाजप-शिवसेनेकडून अनुप सूर्यवंशी,राहुल हाडके, प्रदीप माने यांनी प्रतिष्ठेची केली होती. मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत उपसरपंचपदाची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता असल्याचे परिस्थितीवरून दिसून येत असताना राष्ट्रवादीच्या हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या राजेंद्र तांबे,उदय कबुले यांनी गनिमी काव्याने भाजप-शिवसेनेचे शिलेदार असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या मंगल क्षिरसागर यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत धक्कातंत्र दिला. यावेळी हा धक्का देत असतानाच निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेचा आणखी एक ग्रामपंचायत सदस्य गळाला लावून मतदान करायला लावत संबंधित सदस्याला पडद्यावर न आणल्याने शिरवळमध्ये एक मत नेमके फुटले कोणाचे ? यावर विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मतपत्रिकेच्या खुणेवरून सरपंच लक्ष्मी पानसरे व राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक ?
शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये निवडणूकप्रक्रिया पार पाडत असताना गुप्त मतदान प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला . यावेळी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्या रिजवाना काझी यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आक्षेप घेत संबंधित मत बाद करण्याची मागणी सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी सभागृहामध्ये घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. यावेळी सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याशी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा शिरवळ ग्रामपंचायतस्थळी होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |