02:55pm | Sep 21, 2019 |
कराड : भारत सरकार गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्रालय आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी यांचेमार्फत दरवर्षी स्वच्छतेच्या अनुषंगाने देशातील सर्व नगरपरिषदांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मलकापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतला असून, त्याची अंमलबजावणी एप्रिल 2019 पासून सुरू आहे. मलकापूर नगरपरिषदेला देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये146 वा व स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 51 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत दिनांक 11 सप्टेंबर ते 19 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत लोकसहभागातून स्वच्छता हीच सेवा ही मोहिम राबविणेबाबत शासन निर्देश आहेत. निर्देशान्वये मलकापूर नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी, श्रमदान व स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रबोधनपर जनजागृती बैठक इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी सुरू आहे.
याअनुषंगाने मलकापूर नगरपरिषदेमार्फत प्रभाग निहाय प्रबोधनपर बैठकींचे लॉ कॉलेज भारती विद्यापीठ, नुतन मराठी प्राथमिक शाळा, झोपडपट्टी, गणेश कॉलनी, लाहोटीनगर, बालसंस्कार केंद्र, साईनगर,लक्ष्मीनगर इ.ठिकाणी कार्यक्रम पार पडले आहे. उद्या शनिवार दिनांक 21/09/2019 रोजी झेड. पी. कॉलनी नगरपरिषद सभागृह आगाशिवनगर व स्वा. सै. स्व. भास्कररावजी शिंदे उद्यान विठ्ठलदेव सोसायटी, मलकापूर याठिकाणी प्रबोधनपर बैठक आयोजित केली आहे.
प्रबोधन बैठकी दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2020 व त्याच्या अनुषंगाने विचारल्या जाणार्या प्रश्नावलीची संपुर्ण माहिती व त्याची उजळणी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम धनंजय येडगे यांनी घेतली. तसेच श्री. मनोहर शिंदे उपाध्यक्ष तथा सभापती पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्य व जलनिस्सारण समिती यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता हीच सेवा अभियान व मलकापूर शहराचे स्वच्छतेबाबतचे बदलते रूप व भविष्यामध्ये स्वच्छतेबाबत शहरामध्ये होणारे आमुलाग्र बदल, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून ती सार्वजनिक जबाबदारी असलेची माहिती नागरिकांना दिली.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 करिता पहिल्या 10 मध्ये येण्याचा मनोदय व्यक्त केला असता नागरिकांनी त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी आपले मलकापूर देशपातळीवर अग्रेसर राहणेस सहभाग नोंदवु असे आश्वासन दिले. सभापती महिला व बालकल्याण समिती सौ. आनंदी मोहन शिंदे यांनी महिलांचे आरोग्य, आहार व त्यांची प्रकृतीस आवश्यक असणारी स्वच्छता याबाबतची माहिती दिली. महिला नगरसेविका सौ. पुजा गणेश चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी नगरपरिषदेच्या महिला नगरसेविका सौ. गितांजली शहाजी पाटील, सौ. भारती दिलीप पाटील, सौ. कमल आनंदराव कुराडे, सौ. शकुंतला विठ्ठल शिंगण, सौ. स्वाती समीर तुपे, सौ. नंदा संजय भोसले, सौ. अलका अशोक जगदाळे, व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |