04:37pm | May 16, 2019 |
सातारा : सातार्यात अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता ते बाळ बेकायदेशीररीत्या दत्तक दिल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकूण पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. बाळाची विक्री झाल्याचे समोर आल्याने घटनेने खळबळ उडाली असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विभागाच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
उषा दिनकर जगताप, दिनकर जगताप (दोघे रा.खावली ता.सातारा), सौ.मंगल नामदेव तुपे, नामदेव साहेबराव तुपे (दोघे रा.विकासनगर, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी रोहिणी सुरेशचंद्र ढवळे (वय ३६, मूळ रा.वडगाव, शिरुर, पुणे सध्या रा.पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या महिला बाल कल्याण समितीच्या अधिकारी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात एका अल्पवयीन मुलीने मार्च २०१९ मध्ये मुलाला जन्म दिला होता. मुलाचा सांभाळ करु शकत नसल्याने तसा अर्ज व नंतर पुढे ते बाळ त्या मातेने जिल्हा महिला बाल समितीकडे दिले होते. पुढे तेथून ते बाळ म्हसवड येथील शासकीय शिशुगृहात पाठवण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया १२ मार्च २०१९ रोजी पार पडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या मातेने त्या मुलाचा ताबा परत द्यावा, असा अर्ज करुन त्या बाळाचा ताबा मिळवला होता.
बाळाचा परत ताबा मिळवल्यानंतर जिल्हा महिला बाल समितीने त्या मातेला बाळासह महिन्यातून एकदा विभागात हजेरी लावण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्या मातेने मुलासह महिला बाल कल्याण समितीपुढे हजेरी लावली. मात्र त्यानंतर ती माता व बाळ बेपत्ता झाले. या घटनेचा सर्व पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अल्पवयीन मातेने ते बाळ कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता दुसर्याला दिले असल्याचे समोर आले. या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर अखेर बुधवारी रोहिणी ढवळे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. यातील संशयित माता अल्पवयीन असून बाळ देणारे व बाळ घेणार्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि पवार पुढील तपास करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |